मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी? करून पहा हे 7 उपाय

आजकाल आपली मुले मोबाईल च्या जाळ्यात अडकलेली दिसतात. प्रत्येकाच्या घरात मुले पालकांचा मोबाईल हाताळतात. आणि तासनतास मोबाईल मध्ये गेम खेळण्यात तसेच Youtube वरचे व्हिडीओ पाहण्यात दंग असतात. यामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. अशी ओरड प्रत्येक पालकांकडून आपल्याला ऐकायला मिळते. मुलांना खरच अभ्यासाची गोडी नाही का? मुले अभ्यासच करत नाही. या कोव्हीड 19 च्या काळात तर शाळा बंद असल्यामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडला आणि आता नव्याने पुन्हा मुलांना अभ्यासाची गोडी लावणे हे प्रत्येक पालकांसाठी आव्हानात्मक झाले आहे. पण काळजी करू नका आजच्या आर्टिकल मधून आपणास मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी? आपण पालक म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी, त्यासाठी मुलांचे मन अभ्यासात रमण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल? याबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत.


मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी


{tocify} $title={Table of Contents}

मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी? करून पहा हे 7 उपाय 


1. अनुकरण - पद्धतीने अभ्यासाकडे आकर्षित करा.


मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी आपण मुलांना वारंवार अभ्यास कर, अभ्यासाला बस, नाहीतर मार खाशील असे म्हणत असतो. मात्र असे न करता सुरुवातीला मुलांना अभ्यासाला बसण्याआधी आपणहून स्वतः एखादे पुस्तक किंवा आपले अभ्यासाचे काम करावे. यासाठी मुलांना देखील आपण सांगावे की, हे बघ मी पण अभ्यास करत आहे. आता तू पण अभ्यासाला बस अशा सूचना देऊन आपण मुलांना अभ्यासाकडे आकर्षित करू शकतो. कारण लहान मुले हे अनुकरणातून शिकत असतात. आपण स्वतः अभ्यासाला बसू तेव्हा मुले देखील आपले अनुकरण करतील आणि अभ्यासाला बसतील. 


2. दैनंदिन अभ्यासाच्या वेळा निश्चित करा.


दिवसभरातील मुलांचे शेड्युल हे आदर्शवादी असावे, आदर्शवादी म्हणजे काय तर जे पण काही आपण मुलांना दिवसभरात ज्या गोष्टी मुलांनी करणे अपेक्षित आहे. त्याचे योग्य नियोजन , दिनचर्या ठरवताना कोणता वेळ खेळासाठी, अभ्यासासाठी द्यायचा? कोणता वेळ इतर ऍक्टिव्हिटी साठी द्यायचा आहे. त्याचे नियोजन करावे.

मुलांच्या दैनंदिन अभ्यासाचे नियोजन करताना मुलांचा वयोगट लक्षात घेऊन मुलांची एका जागेवर बसण्याची क्षमता (वेळ) किती आहे? त्यानुसार आपण अभ्यासाच्या वेळा ठरवाव्यात. त्यामध्ये अजून एक काळजी अशी घ्यावी की, मुलांना कोणत्या वेळेत अभ्यास करायला आवडते? याचा एक अंदाज घेऊन ती वेळ अभ्यासासाठी निवडावी. 

मुलांच्या दैनंदिन दिनचर्येचे (अभ्यासाच्या) वेळेचे एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार मुलांना अभ्यासाची सवय लावता येईल. एकदा का सवय लागली की, मग मुले स्वतःच अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करू लागतील. अभ्यासाचा एक नियम (स्वयंशिस्त) मुलांना लावणे आवश्यक आहे.

3. योग्य अभ्यासाची जागा निवडा त्यासाठी अभ्यासाचे वातावरण निर्माण करा.


तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण लहान वयात किंवा उच्च शिक्षण घेत असताना अभ्यास करण्यासाठी एका निश्चित जागी आपण अभ्यास करायचो. बऱ्याच जणांना जागा बदलली की, झोप येत नाही हे आपण अनुभवले असेल, अभ्यासाच्या जागेचे अगदी तसेच आहे. एका निश्चित जागेवर अभ्यासाची सवय लागली मग गोडी निर्माण होते. 

 जेव्हा मुलांना अभ्यासाला बसवायचे तेव्हा अभ्यासाची जागा फिक्स करा. त्या ठिकाणी अभ्यासाच्या संदर्भातील चित्र,गणितीय सूत्रे, शॉर्ट नोट्स, प्रेरणा देणारे सुविचार, भिंतीवर चिकटावे जेणेकरून त्या जागेवर गेल्यानंतर असं वाटायला हवं की, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी मुलांना आनंदमय वातावरण मिळेल.

4. अभ्यास करण्याच्या पध्दतीत बदल करून पहा.


पारंपरिक पद्धतीने अभ्यास करण्याच्या पद्धती व्यतिरिक्त नविन पद्धत वापरून पहा. प्रत्येक मुलाची शिकण्याची शैली वेगवेगळी असते. कोणाला वाचून चांगले समजते. तर कोणाला लेखन करताना वाचन केलेले जास्त चांगले समजते. काहीजणांना पाहून म्हणजेच आताच्या डिजिटल युगातील द्रुक श्राव्य साधनाद्वारे चांगले समजते. त्यासाठी काही व्हिडीओ, ऑडिओ च्या माध्यमातून अभ्यास करता येईल मात्र या माध्यमाचा वापर पालकांनी खुप काळजीपूर्वक करावा. 


मुलांच्या आवडीच्या विषयापासून सुरुवात करा. आणि मुलांना अभ्यासातील काही समस्या, अडचणी असतील तर समजावून सांगा. पालकांनी मुलांच्या अभ्यासात सहभागी व्हा.

5. मुलांच्या अभ्यासाचे कौतुक करा.


मुले जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेत असतील तर बऱ्याचदा मुले काय अभ्यास करतात? बरोबर करतात की, काही चुकीचे करत आहे. यामध्ये बऱ्याच पालकांना इंग्रजी न समजल्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. आणि मग कोणत्या गोष्टीचे कौतुक करायचे? कशाबद्दल शाबासकी द्यायची हे समजत नाही. तेव्हा पालकांनी मुलांचा अभ्यास समजून घ्यावा. जर इंग्रजी त अडचण असेल तर युट्युब वर खूप सारे व्हिडीओ आपल्याला मिळतील. मुलांच्या अभ्यासाचे कौतुक योग्य वेळी करा. त्यांना योग्य वेळी शाबासकी ची थाप त्यांच्या पाठीवर असुद्या. जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि मुले अभ्यासात रमतील.

6. मुलांसोबत बोलण्याची पद्धत बदलून पहा.


आपण मुलांना ओरडून सांगतो की, अभ्यासाला बस, नाहीतर मार भेटेल. घरातील ताण-तणाव आपण बऱ्याचदा मुलांवर काढतो आणि मारून दडपून त्यांना अभ्यासाला बसवतो. मात्र अशावेळी मुले अभ्यासाला तर बसतात. पण त्यांचे लक्ष दुसरीकडेच असते.

आपल्याला जर मुलांना खरोखर अभ्यासाची गोडी लावायची असेल तर घरातील आई-वडिलांचे वाद किंवा इतर कौटुंबिक चर्चा मुलांसमोर करू नका. त्यामुळे मुलांच्या मनावर त्याचा अप्रत्यक्षपणे गंभीर परिणाम होतात. आपल्याला वाटत असते. की, मुलांना काय समजते. पण वय 4 वर्षा पासूनच्या मुलांना सर्व गोष्टी समजत असतात. त्यामुळे मुलांना अभ्यासाला बसवताना हसत-खेळत आनंदाने त्याला अभ्यासाला बसवा. त्याला आनंद वाटेल, आपुलकी वाटेल अशा आवाजात बोला, आवश्यक असेल तेव्हाच ओरडा म्हणजे मुले आपोआप अभ्यासाला बसतील आणि एकदा का मुलांना अभ्यासाची सवय जडली की, मग त्यांना सांगण्याची वेळ देखील येणार नाही.

7. मुलांचे आरोग्य (पुरेशी झोप व योग्य आहार) याकडे लक्ष द्या.


आरोग्य धनसंपदा ! आरोग्य चांगले असेल तर सर्व काही करता येईल. मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आजकालची मुले फास्टफूडच्या खूप मोठ्या प्रमाणात आहारी गेले आहे. त्यांना यातून बाहेर काढा. आपल्या परंपरागत चालत आलेला आहार द्या. त्यासोबत मुलांना पुरेशी झोप होईल यासाठी तसे वातावरण त्यांच्यासाठी उपलब्ध करून घ्या. 

आजकाल या धावपळीच्या युगात कोणतीच गोष्ट वेळेवर होताना दिसत नाही. जेवणाच्या वेळा , झोपायच्या वेळा सारं काही बदलून गेलंय मात्र आता यासाठी मुलांना स्वयंशिस्त लावायला हवी. आशा करतो आपल्याला हे आर्टिकल मुलांना अभ्यासाची सवय लावण्यासाठी उपयुक्त ठरेल. अशाच नवनविन अपडेट साठी शिक्षण मित्र या वेबसाईट ला भेट द्या.



शैक्षणिक (शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, करियर, शैक्षणिक ताज्या घडामोडी) , पालकत्व (Parenting Tips), सरकारी योजना, निबंध, दिनविशेष अशा उपयुक्त माहितीसाठी आवर्जून शिक्षण मित्र Whatsapp जॉईन करा. त्यासाठी आपला अचूक नंबर नोंदवा.



आणखी वाचा
Post a Comment (0)
Previous Post Next Post