असाध्य ते साध्य करीता सयास ! कारण अभ्यास तुका म्हणे!! प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सुशिक्षित परिवार सु:खी परिवार. असे आपण बरेचदा ऐकतो, वाचतो. प्रत्येक पालक आपल्या मुलांना लहान वयापासून त्यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊन चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. सर्वच पालकांना पडणारा सामान्य प्रश्न म्हणजे मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत टाकावे? म्हणजे मुलांना इंग्रजी माध्यमाची शाळा योग्य राहील? की सेमी इंग्रजी किंवा मराठी माध्यमाची शाळा योग्य राहील. हा गोंधळून टाकणारा प्रश्न पालकांसमोर असतो. आज आपण मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत टाकावे? याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. तेव्हा आपल्याला देखील हा प्रश्न पडला असेल आणि आपण मुलांसाठी कोणती शाळा निवडावी? अशी संभ्रम अवस्था असेल तर हे आर्टिकल अवश्य वाचावे. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया.