स्टोरीवेव्हर प्रथम बुक्स गोष्टीचा शनिवार उपक्रम माहिती | Storyweaver Pratham Books Goshticha Shanivar Upkram

माणसाच्या पूर्वीपासून चालत आलेल्या तीन मुलभूत गरजा आपल्याला माहिती आहे. अन्न,वस्र आणि निवारा या तीन मुलभूत गरजा आहेत. आता चौथी गरज म्हणजे शिक्षण ही देखील मानवाची महत्त्वाची गरज बनली आहे.

राष्ट्राच्या विकासासाठी भविष्यातील देश कसा असेल? हे सध्या मुलांना आपण कसे शिक्षण देत आहोत , यावर आपले भविष्य अवलंबून आहे. कोरोनासारख्या महामारी मध्ये सर्व जनजीवन अचानक पणे ठप्प झालेले आपण अनुभवले. प्रत्येक क्षेत्रात सुरुवातीच्या काळात खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. शिक्षण क्षेत्रात देखील मुलांचे शिक्षण कसे सुरु राहतील. यासाठी खूप सारे प्रयत्न होताना आपण अनुभवले त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण, व्हर्च्युल क्लास , ऑफलाईन शिक्षण खूप सारे प्रयोग या दरम्यान शिक्षक बांधवानी राबविले. हळूहळू जनजीवन पूर्व पदावर येत आहेतच. परंतु भविष्यात ही अशी आपत्ती पुन्हा जगावर येऊ नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे या तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्या कामासाठी कसा करता येऊ शकेल यासाठी आपण ICT कौशल्य शिकून घेणे काळाची गरज बनली आहे. 

कोरोना च्या कालखंडामध्ये आपण पहिले कि, वर्क फ्रॉम होम हि संकल्पना उदयास आली. IT क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. शिक्षण क्षेत्रात ही आमुलाग्र बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मध्ये देखील ICT , ई-लर्निग , Digital शिक्षण पद्धती विकसित होत आहे.  

Storyweaver Pratham Books Goshticha Shanivar
Storyweaver Pratham Books Goshticha Shanivar


दरम्यानच्या काळात शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे SCERT PUNE यांच्या मार्फत संपूर्ण राज्यभर मुलांचे शिक्षण सुरु रहावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये SCERT स्वाध्याय उपक्रम , Whatsapp च्या माध्यमातून इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय निहाय प्रश्नांचा सराव करता येतो. आता यामध्ये अजून सुधारणा होऊन convegenius swadhyay web आवृत्ती वर उपलब्ध करण्यात आला आहे. 

>> स्वाध्याय मराठी उपक्रम लिंक २०२२ 

त्याचबरोबर शिकू आनंदे learn with fun हा मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील दर शनिवारी SCERT Youtube channel वर शिकू आनंदे लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गोष्टीचा शनिवार हा उपक्रम राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी गोष्टीचा शनिवार या उपक्रमाची राज्यातील शाळांमध्ये  अंमलबजावणी सुरु आहे. Storyweaver Pratham Books Goshticha Shanivar उपक्रमा बद्दल जाणून घेऊया. गोष्टीचा शनिवार उपक्रम माहिती

{tocify} $title={Table of Contents}

गोष्टीचा शनिवार उपक्रम माहिती | Goshticha Shanivar Upkram

वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे सध्या वाचन संस्कृती कुठे तरी लोप पावत आहे तंत्रज्ञानाच्या या डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृतीची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी गोष्टीचा शनिवार  या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीचा विकास व्हावा तसेच मुलांमध्ये वाचनाच्या सवयी विकसित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
गोष्टीचा शनिवार हा उपक्रम स्टोरीविव्हर (storyweaver), प्रथम बुक्स (pratham books) , युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

Goshticha Shanivar उपक्रमांतर्गत मुलांना मराठी, उर्दू, इंग्रजी या भाषेतून गोष्टीची पुस्तके व्हाट्सअप च्या माध्यमातून ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरुपात गोष्टींचा शनिवार लिंक, गोष्टीचा शनिवार उपक्रम pdf , Video पोहोचविण्यात आले आहेत.

ग्रामीण भागांमध्ये अजूनही काही पालकांकडे विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनची उपलब्धता नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी 'मिस कॉल द्या गोष्ट ऐका' ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे | Goshticha Shanivar Upkram Fayade

आपल्याला आठवते का? लहान पणी आपले आजी-आजोबा आपल्याला गोष्टी सांगत असत. आणि आपण त्यांच्या गोष्टी अगदी मन लावून ऐकत होतो.

गोष्टीचा शनिवार उपक्रमामध्ये Storyweaver, Pratham Books च्या माध्यामातून मुलांना storyweaver stories, pratham books, storyweaver marathi , urdu , english भाषेत साहित्य उपलब्ध करण्यात आले आहेत. यामाध्यमातून मुलांना छान छान गोष्टी वाचायला , ऐकायला , Video मधून पाहायला मिळतात. त्यायोगे मुलांचा भाषिक विकास चागल्या प्रकारे होण्यास मदत होते. Goshticha Shanivar उपक्रमाचे खूप सारे फायदे मुलांना होतात.  

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे | Goshticha Shanivar Upkram Fayade

  1. मुलांचा भाषिक विकास होतो.
  2. मुलांच्या शब्दसंपदा मध्ये भर पडते.
  3. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते.
  4. श्रवण-वाचन-लेखन कौशल्य विकसित होण्यास मदत होते.
  5. गोष्टी ऐकल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो.
  6. वाचनाची गोडी लागते.
  7. गोष्टीचा शनिवार उपक्रमामध्ये मुलांना दृक-श्राव्य माध्यमातून गोष्टी मिळतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या मुलांना याचा फायदा होतो. (उदा. अंध मुलांना गोष्टी ऐकायला मिळते. , कर्णबधीर मुल गोष्टीचा शनिवार pdf मधील गोष्टी वाचते.)
  8. मुलांच्या संभाषण कौशल्य वाढण्यासाठी याची मदत होते.
  9. मनोरंजनात्मक पद्धतीने मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होते.
  10. एकंदरीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टी वाचणे, ऐकणे , पाहणे मुलांसाठी फायद्याचे आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक | Goshticha Shanivar Upkram Link

गोष्टीचा शनिवार हा उपक्रम स्टोरीवेव्हर (https://storyweaver.org.in/), प्रथम बुक्स (https://prathambooks.org/) , युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. 


दर शनिवारी मुलांसाठी Goshticha Shanivar Whatsapp Group च्या माध्यमातून storyweaver marathi , Pratham Books Link , गोष्टीचा शनिवार उपक्रम pdf , गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक पाठवण्यात येते. अशा या गोष्टीच्या शनिवार उपक्रमाचा आपण सर्व पालकांनी आपल्या मुलांना अवश्य सहभागी करून घ्यावे. 


Storyweaver वेबसाईटवर आपण मराठी , हिंदी , उर्दू , इंग्रजी भाषेत गोष्टी वाचता येतील. लिंक खाली दिलेली आहे. अवश्य भेट द्या.


>> ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध


Post a Comment (0)
Previous Post Next Post