PPC 2024 Registration : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी येथे करा - डायरेक्ट लिंक

PPC 2024 Registration : मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा 7 वा संवादात्मक कार्यक्रम 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha 2024) तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या कार्यक्रमात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, नोंदणी (Registration) करून तुम्हाला प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

$ads={1}

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी येथे करा -  डायरेक्ट लिंक

PPC 2024 Registration

परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) हा कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे.

इयत्ता सहावी ते बारावी मध्ये शिकणारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून, त्यासाठी दिनांक 12 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी केले आहे.

तसेच MyGov वर स्पर्धांच्या माध्यमातून निवड झालेले सुमारे 2050 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मा. संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र तसेच PPC किट भेट  देण्यात येणार आहे.

परीक्षा पे चर्चा नोंदणी करण्यासाठी डायरेक्ट लिंक

खाली दिलेल्या (Pariksha Pe Charcha 2024 Registration) डायरेक्ट लिंकद्वारे दिनांक 12 जानेवारी 2024 पर्यंत नोंदणी करता येणार असून, सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागीना संचालक NCERT यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र (PPC 2024 Certificate) मिळणार आहे. सन 2024 करीता सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे.

(आवश्यक माहिती भरण्यापूर्वी सर्व माहिती वाचूनच व घेऊनच नोंदणी करावी) म्हणजे नोदणी योग्य पद्धतीने होईल.

$ads={2}

परीक्षा पे चर्चा 2024 नोंदणी येथे करा

विशेष मुलांसाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post