Rehabilitation Center For Special Children : मुंबई सेंट्रलच्या नागपाडा येथे प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
$ads={1}
विशेष मुलांसाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
विशेष मुलांच्या (Special Children) पालकांना कायमच आपल्या मुलांची काळजी वाटत असते. त्यांच्या गरजा ही विशेष असतात, या रुग्णालयाच्या माध्यमातून त्या पूर्ण होत आहेत. अशा प्रकारची अजून दोन केंद्र पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये प्रत्येकी एक तर ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.
या केंद्रामध्ये या मुलांवर मोफत उपचार केले जाणार आहेत ही समाधानाची बाब असल्याचे यावेळी सांगितले. तसेच या केंद्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
विशेष मुलांच्या पालकांना कायमच आपल्या मुलांची काळजी वाटत असते. त्यांच्या गरजा ही विशेष असतात, या रुग्णालयाच्या माध्यमातून त्या पूर्ण होत आहेत. अशा प्रकारची अजून दोन केंद्र पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. या केंद्रामध्ये या मुलांवर मोफत उपचार… https://t.co/g8PFlbtdvm pic.twitter.com/dO1hfnztsm
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 24, 2023
महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.