NHM Recruitment 2023 24 : कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविणेत येणा-या विविध कार्यक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीकरीता एकत्रीत मानधनावर कंत्राटी रिक्त विशेषज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यांची थेट मुलाखत तसेच एएनएम, फार्मासिस्ट, इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर (ANM, Pharmacist, Immunization Field Monitor) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेत आले आहेत.
$ads={1}
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी पद भरती जाहीरात सन 2023 24
फार्मासिस्ट, एएनएम तसेच इम्युनायझेशन फिल्ड ऑफिसर या पदाकरीता अर्ज करणा-या ईच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज विहीत नमून्यात कार्यालयीन कामकाजाचे वेळी दिनांक १८ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ अखेर मा.आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदाकरीता अर्ज असा लिफाफ्यावर उल्लेख करुन वेळेत पोहोच होईल याप्रमाणे सादर करावयाचा आहे.
तसेच विशेषज्ञ व अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी ही पदे थेट मुलाखत घेऊन भरणेत येणार आहे. या पदाकरीता प्रत्येक सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत अर्ज स्वीकारले जातील. तदनंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता मा.उपायुक्तसो-२ यांचे दालनामध्ये कोल्हापूर महानगरपालिका येथे गठीत करणेत आलेल्या समितीद्वारे मुलाखत घेऊन राबविणेत येईल.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत - अर्ज करण्याची पध्दत
- उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यातच संगणकिकृत अर्ज करावा.
- विहीत नमुन्यात अर्ज साक्षांकित प्रतींसह मा.आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर या पत्यावर दिनांक २६/१२/२०२३ ई. रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत पोहोच होतील अशा पध्दतीने पाठवावेत.
- अर्जासोबत पुढील आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात.
- त्यामध्ये शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, पदानुसार संबंधीत कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेले नोंदणी प्रमाणपत्र, जन्म नोंदीचा पुरावा असलेले प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तसेच इतर अनुषंगिक कागदपत्र, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, राखीव उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र, साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात.
- एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचे असल्यास प्रत्येक पदासाठी वेगवेगळे व परिपूर्ण अर्ज करावेत.
$ads={2}
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना येथे डाउनलोड करा
महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.