Sarkari Naukri 2023 : पशुसंवर्धन विभागामध्ये सरळसेवा पदांची मोठी भरती, जाणून घ्या पदे आणि वेतनश्रेणी, ऑनलाईन अर्ज सुरु..

Sarkari Naukri 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागामध्ये 446 जागांची सरळसेवा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑनलाईन अर्ज भरण्यास 27 मे 2023 पासून सुरुवात झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत 11 जून 2023 पर्यंत देण्यात आलेली आहे. सविस्तर जाहिरात पाहूया.

पशुसंवर्धन विभागामध्ये सरळसेवा पदांची मोठी भरती

Sarkari Naukri 2023

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 हजार जागांची मेगा भरती 15 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून, सरकारी नोकरीच्या जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे.

या अंतर्गत पशुसंवर्धन विभागात सरळसेवा कोट्यातील पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यामध्ये एकूण 446 पदे भरली जाणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. [सैन्य दलात CDS परीक्षेची तयारी मोफत प्रशिक्षण येथे पहा]

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख - दिनांक 27 मे 2023 सकाळी 10 वाजता पासून सुरुवात
  • ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत - दिनांक 11 जून 2023 रात्री 11.59 पर्यंत
  • ऑनलाईन परीक्षेचा दिनांक - www.ahd.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा

उमेदवारांचे वय गणन करण्याची तारीख 1 मे 2023 आहे.
  • वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय 38 वर्ष
  •  (मागासवर्गीयांसाठी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.)
  • मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षांपर्यंत
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षापर्यंत.
  • पात्र खेळाडूच्या बाबतीत ४३ वर्षापर्यंत.
  • माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्षे विकलांग माजी सैनिकांबाबतीत कमाल 45 वर्षापर्यंत.
  • अनाथ उमेदवाराच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत.
  • अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत.

पदांचा तपशील व वेतन

१) पदाचे नाव - पशुधन पर्यवेक्षक (गट-क), वेतनश्रेणी एस-८, (२५५००-८११००)
एकूण जागा - 376
२) पदाचे नाव - वरिष्ठ लिपीक (गट-क), वेतनश्रेणी :- एस-८, (२५५००-८११००)
एकूण जागा - ४४
३) पदाचे नाव - लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१५, (४१८००-१३२३००)
एकूण जागा - २
४) पदाचे नाव - लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१४, (३८६००- १२२८००)
एकूण जागा - १३
५) पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१३ (३५४००-११२४००)
एकूण जागा - 4
६) पदाचे नाव - तारतंत्री (गट-क), वेतनश्रेणी :- एस-०६. (१९९००-६३२००)
एकूण जागा - 3
७) पदाचे नाव - यांत्रिकी (गट-क), वेतनश्रेणी:- एस-०६. (१९९००-६३२००)
एकूण जागा - 2
८) पदाचे नाव - बाष्पक परिचर (गट-क), वेतनश्रेणी :- एस-०६, (१९९००-६३२००)
एकूण जागा - २

[सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी येथे पहा]

{वरील पदांच्या आरक्षणाचा तपशील जाहिरातीमध्ये सविस्तर नमूद केला आहे.}

आवश्यक शैक्षणिक अहर्ता

Sarkari Naukri 2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023


पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार 828 जागांची मेगा भरती येथे पहा
जाहिरात येथे डाउनलोड करा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

                                                             



Post a Comment (0)
Previous Post Next Post