Sbi Fellowship Program 2023 : तरुणांना ग्रामीण भागात काम करण्याची सुवर्णसंधी ! दरमहा मिळणार 17 हजार रुपये, ऑनलाईन अर्ज सुरु..

SBI Fellowship Program 2023 : राज्यातील ग्रामीण फेलोशिप योजनेत काम करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी महत्त्वाची बातमी, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्या वतीने युथ फॉर इंडिया फेलोशिप 2023 24 या प्रोग्राम साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, सविस्तर पाहूया..

स्टेट बँक ऑफ इंडिया युथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्राम 2023 24

Sbi Fellowship Program 2023

SBI Youth for India Fellowship प्रोग्राम हा देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी युवकांना संधी मिळते. हा प्रोग्राम ग्रामीण भागातील समाजाशी निगडीत असून, यामध्ये ग्रामीण भागातील लोकांचे आव्हाने कमी करण्यासाठी या प्रोग्राम मधून लोकांना सहकार्य केले जाते. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्या वतीने युथ फॉर इंडिया फेलोशिप 2023 24 या प्रोग्राम राबविला जातो. [पशुसंवर्धन विभागामध्ये सरळसेवा पदांची मोठी भरती]

पात्रता

  • भारतीय नागरिकत्व आवश्यक
  • ज्यांचे वय 21 ते 32 वर्ष आहे असे युवक 
  • 1 ऑक्टोबर 2023 रोजी पदवी पूर्ण असणारे युवक अर्ज करू शकतात. (Bachelor’s degree should be completed before 1st October, 2023)

SBI Youth for India Fellowship प्रोग्राम हा एकूण 13 महिन्याचा असून, या कालावधीत दरमहा 15 हजार रुपये, 1 हजार रुपये प्रवास भत्ता आणि 1 हजार रुपये इतर खर्च असे एकूण दरमहा 17 हजार रुपये दिले जाते. आणि प्रोग्राम यशस्वी पूर्ण केल्यानंतर 60 हजार रुपये भत्ता मिळणार आहे, आणि सोबत आरोग्य आणि वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण देखील दिला जाणार आहे.

ऑनलाईन अर्ज 

ऑनलाईन अर्ज हे https://register.you4.in/ या अधिकृत वेबसाईटवर करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मे 2023 पर्यंत आहे.

[Start your SBI Youth for India Fellowship 2023-24 Application closing on 31st May 2023 (Wednesday), 11:59 PM IST]

निवड प्रक्रिया

Stage 1 नोंदणी आणि ऑनलाईन टेस्ट (Registration and Online Assessment)

या फेलोशिपमध्ये निवड होण्यासाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी आपला नोंदी फॉर्म ऑनलाईन भरावा, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काही प्रश्न विचारण्यात येतील त्याची उत्तरे द्या.

Stage 2 मुलाखत (Personal Interview)

त्यानंतर स्टेज दोन मध्ये तुमची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल आणि त्यानुसार तुमचे अंतिम निवड करण्यात येईल. [प्रोग्राम विषयी सविस्तर माहिती येथे मिळवा]

ऑनलाईन अर्ज येथे करा

भारतीय सशस्त्र सैन्यदलाची तयारीसाठी मोफत प्रशिक्षण येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post