Post Office Recruitment 2023 : [जाहिरात] पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार 828 जागांची मेगा भरती, 10 वीच्या गुणांवर होणार थेट निवड, ऑनलाईन अर्ज सुरु..

Post Office GDS Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी, इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार 828 जागांची मेगा भरतीची जाहिरात निघाली असून, इयत्ता दहावी पास उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, ऑनलाइन अर्ज भरण्यास 22 मे 2023 पासून सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे, सविस्तर बातमी पाहूया..

पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार 828 जागांची मेगा भरती

Post Office Recruitment 2023

जानेवारी 2023 मध्ये ग्रामीण ग्रामीण डाक सेवक या पदाची मोठी भरती केल्यानंतर आता इंडियन पोस्ट ऑफिस मार्फत शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी भरती होणार आहे. (Post Office Gds Recruitment 2023)

याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन इंडियन पोस्ट www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 20 मे 2023 रोजी जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता इयत्ता 10 वी पास उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. 

ऑनलाइन अर्ज भरण्यास 22 मे 2023 पासून सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार https://www.indiapostgdsonline.gov.in/  या अधिकृत  वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरू शकता.

10 वीच्या गुणांवर होणार थेट निवड

पोस्ट ऑफिस मध्ये निघालेले या भरतीमध्ये इयत्ता दहावी पास उमेदवारांची निवड ही दहावी परीक्षेच्या प्राप्त गुणांच्या आधारे केली जाणार आहे. अर्थात दहावीच्या गुणांवर उमेदवारांची थेट निवड होणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा इच्छुक उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा.

पोस्ट ऑफिस मेगा भरती जाहिरात PDF येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

                                                             

Post a Comment (0)
Previous Post Next Post