कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये ओमायक्रोन च्या धर्तीवर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या मात्र याबाबत मधल्या कालावधीमध्ये शिक्षण तज्ञांनी, शिक्षक संघटनांनी तसेच पालक वर्ग, स्थानिक प्रशासन यांच्यामार्फत सातत्याने शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद नोंदवण्यात आला. राज्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य ही प्राथमिकता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्य शासनाने राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आले आहे 24 जानेवारी 2022 रोजी पासून शाळा सुरू होणार आहेत.
त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी यांचे 100% लसीकरण , कोव्हीड-19 नियमाचे पालन यासंबंधी ही सर्व खबरदारी घेऊन स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत अधिकार प्राप्त करण्यात आले आहेत. या संबंधी समिती गठित करण्यात विषयी सविस्तर मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांना खूप खूप शुभेच्छा !