बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये कलम १२ (१) (सी) नूसार खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रू. एक लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालकांना आर.टी.ई. २५% प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येतो.
>> RTE admission age limit in marathi | बालशिक्षण हक्क प्रवेश 2022 23 वय मर्यादा
>> स्वाध्याय उपक्रम लिंक | ConveGenius Web App Scert Swadhyay Link 2022
>> आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२२-२०२३ | RTE Admission F.A.Q.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालय प्राथमिक, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे सर्व शाळांना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज ०१/०२/२०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. परंतू काही अपरिहार्य कारणास्तव RTE Portal वर सदरचे अर्ज दि. ०१/०२/२०२२ ऐवजी बुधवार दि. १६/०२/२०२२ पासून भरता येतील. असे कळविण्यात आले आहे. याबाबत RTE Portal वर सविस्तर सूचना देण्यात येणार आहे. तेव्हा RTE Portal ला अवश्य भेट देत रहा.
Admission Portal : RTE 25% Reservation
RTE Portal वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
>> RTE admission age limit in marathi | बालशिक्षण हक्क प्रवेश 2022 23 वय मर्यादा