पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - २०२२ (Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2022) बाबत महत्वाची माहिती अशी की, सन २०२२ मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भरण्यात येणाऱ्या आवेदन परिक्षा शुल्कासाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. मात्र आता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी,२०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
याबाबत शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ PUP व PSS या परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरलेले नाही. त्यांनी दिनांक ३१ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
आवेदनपत्र भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दि. २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. सबब परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात प्रसिध्द करण्यात येणार आहे. असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. अधिक माहितीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अपडेट साठी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.