संजय गांधी निराधार पेन्शन योजना | Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana
प्रस्तावना
राज्य शासन तसेच केंद्र शासनामार्फत समाजातील विशेषतः वंचित घटकातील व्यक्तींसाठी शासकीय योजना राबविल्या जातात. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत शिक्षण आणि प्रशिक्षण, आर्थिक उन्नतीसाठी, रोजगार, विशेष सहाय्य, अपंग कल्याण, सामाजिक एकात्मता, सामाजिक उपाय, पुरस्कार आदि विषयांशी संबंधित शासकीय योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना अशा विविध योजना राज्य तसेच केंद्र शासनामार्फत वंचित घटकातील व्यक्तींसाठी त्यांचा समाजातील मान उंचावण्यासाठी त्यांना एक आर्थिक सपोर्ट देऊन स्वतःच्या उन्नतीसाठी योजना राबविण्यात येते. आज आपण संजय गांधी निराधार पेन्शन योजना (अपंग पेन्शन योजना) या राज्य पुरस्कृत योजनेची माहिती पाहणार आहोत. योजनेचे लाभार्थी, पेन्शन लाभ स्वरूप, पात्रतेच्या अटी व शर्थी, अर्ज कोणाकडे करायचा? संपर्क कोणाकडे करायचा? याविषयीची संजय गांधी निराधार योजनेची संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.
संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र माहिती | Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana
संजय गांधी निराधार योजना ही सन 1980 पासून राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2008 च्या शासन निर्णयानुसार काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे. संजय गांधी निराधार योजना आता संजय गांधी निराधार अनुदान योजना या नावाने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रतीमाह प्रति लाभार्थी रुपये 600 एवढे अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये आता 400 रुपयाची वाढ करून आता एकुण प्रतिमाह रुपये 1000 इतके अनुदान लाभार्थ्यांना मिळते. त्याचबरोबर या योजनेमधून शेतमजूर महिला हा प्रवर्ग देखील आता वगळण्यात आलेला आहे. तर तृतीयपंथी व परित्यक्ता या प्रवर्गाचा या योजनेमध्ये आता नव्याने समावेश करण्यात आला आहे.
तसेच महिला व बालविकास विभागामार्फत सध्या ज्या ४०३८ देवदासीना लाभ देण्यात येत आहे, त्यांना महिला व बालविकास विभागाच्या योजनेमधून वगळून त्या ऐवजी त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेत / श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मुले २१ वर्षाऐवजी २५ वर्षांची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत (शासकीय / निमशासकीय / खाजगी), यामध्ये जे अगोदर घडेल तो पर्यंत लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
>> अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
>> सुकन्या समृद्धी योजना (SSY) 2022 माहिती मराठी Sukanya Samriddhi Yojana 2022 In Marathi
संजय गांधी पेन्शन योजना लाभ किती मिळणार?
संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नाव नसलेल्या व रु २१०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस मिळणाऱ्या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन लाभार्थ्यास मिळणारी रक्कम दरमहा रुपये १०००/- अशी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/-, १ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये ११००/- व२अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळणा-या दरमहा रुपये ६००/ अर्थसहाय्यात रुपये ६००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १२००/- अशी करण्यात आली आहे.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेमधून रुपये ३००/- निवृत्तीवेतन देण्यात येते. त्याला पूरक असलेल्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून लाभार्थ्यांस देण्यात येणा-या दरमहा रुपये ३००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १०००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-) अशी करण्यात येत आहे. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपत्य नसलेल्य विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १०००/-(केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ७००/-), १अपत्य असलेल्या विधवा भार्थ्यांना दरमहा रुपये ११००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ८००/-) व २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना दरमहा रुपये १२००/- (केंद्र शासनाचे रुपये ३००/- व राज्य शासनाचे रुपये ९००/-) अशी करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजना लाभार्थी कोण ?
- वय 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला
- अनाथ मुले
- अपंगातील दिव्यांग सर्व प्रवर्ग (किमान ४०% अपंगत्व सिव्हील हॉस्पिटलचे अपंग प्रमाणपत्र)
- क्षयरोग,कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला
- निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह )
- घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या
- अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला
- तृतीयपंथी
- देवदासी
- 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री
- तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी
- सिकलसेलग्रस्त
महत्वाचे- योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. {alertInfo}
संजय गांधी निराधार योजना पात्रता अटी आणि शर्ती
- महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 15 वर्षापासून वास्तव्य रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अपंग व्यक्ती अर्जदाराकडे किमान 40 टक्क्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वय हे 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे किंवा रुपये 21000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
संजय गांधी निराधार योजना आवश्यक कागदपत्रे
- जन्म प्रमाणपत्र- ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उता-याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला.
- उत्पन्नाचा दाखला- तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला (अर्जदाराकडून रु.५/- च्या Court Fee Stamp वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार) (अर्जाचा नमुना परिशिष्ट-१३ मध्ये दिला आहे) किंवा दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा सांक्षाकित उतारा.
- रहिवाशी प्रमाणपत्र- ग्रामसेवक/ तलाठी / मंडळ निरिक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.
- अपंगाचे प्रमाणपत्र- अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ (पूर्वीचा १९९५) मधील तरतूदीप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक ( सिव्हील सर्जन ) यांचे (किमान ४०%) प्रमाणपत्र.
- वैद्यकीय प्रमाणपत्र- असमर्थतेचा / रोगाचा दाखला-- जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन), शासकीय रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक यांनी दिलेला दाखला.
- कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा दाखला - तहसिलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरुन दिलेला दाखला व महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला.
- अनाथ असल्याचा दाखला- ग्रामसेवक / मुख्याधिकारी प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी सांक्षाकित केलेला दाखला.
संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय PDF | Sanjay Gandhi Niradhar Yojana GR PDF
संजय गांधी निराधार पेन्शन योजना अर्ज करण्याची पद्धत
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वप्रथम फॉर्म डाउनलोड करा.
- संजय गांधी निराधार अनुदान योजना फॉर्म मध्ये आवश्यक सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- उपरोक्त सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता, यासाठी आपले सरकार या वेबसाईटला भेट देऊन आपले अकाऊंट तयार करा आणि त्या ठिकाणाहून आपण अर्ज करू शकता. मात्र त्यापूर्वी आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवा.
संजय गांधी निराधार योजना संपर्क कोणाकडे करावा?
- संजय गांधी निराधार योजने संदर्भामध्ये कोणतीही अडचण/समस्या असल्यास आपल्या गावातील तलाठी कार्यालय किंवा तालुका स्तरावर तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.