मुलामध्ये शिकण्याविषयी आवड कशी निर्माण करावी?

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. मूल आईच्या गर्भात असताना मुलांचे शिक्षण सुरू होतं. जन्म झाल्यानंतर आणि जन्मापूर्वी पासुनच मुल आजूबाजूचे आवाज कुटुंबातील सदस्यांचे आवाज, आईचा आवाज ऐकत असतं. हे देखील एक प्रकारे शिक्षणच आहे. मुलांची जडण-घडण संस्कार या क्षणापासूनच सुरू होते. आपण जशी दिशा देऊ तसं मूल घडत जातं. हळूहळू मोठा झाल्यानंतर मुल आपल्या कुटुंबातील परिसरातील सदस्यांचे निरीक्षण करत असते. या निरीक्षणातून ऐकण्यातून श्रवणातून मूल शिकत जातं. मुलांच्या शिक्षणासाठी सर्वात महत्त्वाची काळजी ही पालकांना असते. 

बालवयात लहान मुलांना शिक्षणाची फारशी आवड नसते. हे वय म्हणजे लहान मुलांचे खेळण्याचे बागडण्याचे वय असते. मात्र या वयातच आपण मुलांना मुलांच्या शिक्षणासाठी अधिक जोर देण्याचा प्रयत्न करतो. बालवयापासून लहानपणापासूनच मुलांना शिक्षणाची आवड कशा पद्धतीने निर्माण करता येऊ शकते? या विषयीची चर्चा आज आपण करणार आहोत.

How to develop interest in learning



मुलामध्ये शिकण्याविषयी आवड कशी निर्माण करावी? | How to develop interest in learning

अध्ययन शैली ची ओळख | Learning Style

खरंतर आपण मुलांच्या शिकण्याकडे अधिक भर देतो. मुलांच्या दृष्टीने हे एक प्रकारे बर्डन असतं. कोणत्याही पालकांची अशी मुळीच इच्छा नसते. की जबरदस्तीने मुलांना शिकविले पाहिजे, प्रत्येकाला वाटत असते की, आपल्या मुलांनं चांगलं शिकावं. त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत, पुढे जाऊन भविष्यामध्ये एक चांगला नागरिक व्हावा. ही सर्व पालकांची इच्छा असते.  मात्र मुलांना काय आवडतं? मुलांना कशा पद्धतीने शिकवल्यानंतर समजते? या गोष्टीचा आपण फारसा विचार करत नाही. 

पाश्चात्त्य देशांमध्ये अध्ययन शैली या मुलांच्या कोणते आहेत. यावर अधिक भर देण्यात येतो. त्यानुसार मुलांना अध्ययन-अध्यापन, शिक्षण या विषयाची आवड, संस्कार कसे करावेत? याची पालकांना मदत होते. तर या अध्ययन शैली म्हणजे नक्की काय आहे? त्याविषयीची आपण माहीती बघूया.

अध्ययन शैली म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल तर शिकण्याची पद्धत मग, शिकण्याच्या अशा कोणत्या पद्धती आहेत? ज्याप्रमाणे आपण लहान असताना आपल्याला वर्गात एखाद्या शिक्षकाचे शिकवलेले चांगले समजायचे व चांगल्या पद्धतीने लक्षात राहायचे सुद्धा, तर दुसर्‍या शिक्षकांनी शिकवलेले फारसे तेवढे समजायचे नाही. असे का बरं होत असे आपण जर आठवले तर आपल्या असे लक्षात येईल की, प्रत्येक शिक्षकांची शिकवण्याची पद्धती ही वेगवेगळी होती. ज्या शिक्षकांचे शिकवणे आपल्याला अधिक चांगले वाटत होते. त्या शिक्षका विषयी थोडे आपण आठवले तर आपल्या असे लक्षात येईल की, त्यांनी आपण शिकावे म्हणून कोणती अध्ययन शैली वापरली ती आपल्या डोळ्यासमोर येईल.

मुल शिकण्यासाठी मुल कोणत्या शैलीने शिकू शकते. हे जर आपण शोधलं तर मुलांना शिकण्या प्रति आवड निर्माण होण्यास मदत होईल. कोणाला ऐकून चांगले समजते. तर कोणाला पाहून चांगले लक्षात राहते. तर कोणाला प्रत्यक्ष कृती करून शिकायला आवडते.

अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात संशोधनातून असे समोर आले आहे की, मुलांची अध्ययन शैली ओळखून त्यांना जर शिकवले गेले तर 60% हून अधिक प्रगती होते.

प्रत्येक मूल वेगळे असल्यामुळे प्रत्येक मुलाची आकलन करण्याची क्षमताही वेगवेगळी असते. एखादी संकल्पना काही मुलांना वाचून पटकन समजते. तर काहींना ही संकल्पना प्रत्यक्ष कृती करून पाहिल्या शिवाय त्यांना काहीच कळत नाही. तर काही मुलांना ऐकून चांगली त्यांच्या स्मरणात राहते. तर प्रत्यक्ष काही मुलांना त्याचा अनुभव घेतल्याशिवाय ती संकल्पना त्यांच्या लक्षात येत नाही. व्हिडिओच्या माध्यमातून किंवा चित्राच्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभव घेऊन मुलांना ती संकल्पना चांगलीच स्मरणात राहते. हीच पद्धत जर आपण आपल्या मुलांच्या बाबतीत लागू केली आणि मुलांची अध्ययन शैली ओळखून मुलांना शिकवले तर शिकण्याविषयी आवड निर्माण होईल.

>> अध्ययन शैली म्हणजे काय व अध्ययन शैलीचे प्रकार

मनोरंजनातुन शिक्षण | Entertainment Education

बालवयातील वय हे खेळण्याचे आणि बागडण्याचे लहान मुलांना खेळायला खूप आवडते . मनोरंजनात्मक कृती या लहान वयातील मुलांना द्यायला हव्यात. मात्र या उलट आपण काय करतो.? मुलांनी खेळू नये, मुलांनी इतर मनोरंजनात्मक गोष्टी करू नये, त्यांनी फक्त अभ्यास करावा यावर आपला भर असतो.

बाल वयामध्ये मुलांना मनोरंजनात्मक खेळ त्यामध्ये मैदानी खेळ, बैठे खेळ असेल किंवा पझल्स च्या माध्यमातून खेळले जाणारे खेळ असतील या खेळातून मुलांना शिक्षण दिले तर मुलांमध्ये शिक्षण या विषयाची आवड निर्माण होईल.

0 ते 6 वर्षे वयोगट या वयात मुलांचा बौद्धिक विकास हा खूप झपाट्याने होत असतो. या संधीचा लाभ घेऊन आपण मुलांना शिक्षणाची गोडी लावू शकतो त्यामध्ये मुलांना खेळातून शिक्षण या संकल्पनेतून आपण पहायला हवे.

लहान मुलांना नवीन गोष्टी करून बघायला खूप आवडते. त्यामध्ये मुलांसाठी छोट्या-छोट्या कृती मुलांकडून करून घ्यावेत, हे ही एक प्रकारे शिक्षणच आहे. हे सर्व करून घेत असताना मुलांना आपल्याला जे शिकवायचे आहे. शिक्षणाची गोडी लावायची आहे ती देखील या खेळातून, या कृतीतून मुलांसोबत आपण संवाद साधावा. की जेणेकरून मुलांविषयी शिक्षणाची गोडी निर्माण होईल.

नृत्य, वादन, गायन, चित्रकला या विविध मुलांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावेत. लहान मुले फार वेळ एका जागेवर स्थिर बसू शकत नाही. हलन-चलन या वयामध्ये या मुलांकडून अधिक जास्त प्रमाणामध्ये होते. याच गोष्टी आपण पालकांनी लक्षात ठेवायला हवे, जेणेकरून मुलांना शिकण्याविषयाची गोडी लावण्यासाठी आपल्याला छोट्या-छोट्या कृती मुलांकडून कशा करून घेता येईल? यासाठीचे नियोजन आपल्याला करता येऊ शकते.

मुलांचे कौतुक करणे | Appreciate the children

लहान मुलांकडून शिकताना काही चुका झाल्या किंवा इतर काही मुले शिकताना अडखळली तर त्यांना न रागवता, न ओरडता शांतपणे त्यांची चूक त्यांना समजावून देऊन त्यांच्या कृतीचं कौतुक करणं हे फार महत्त्वाचा आहे. ज्या वेळी आपण मुलांची शिकण्यासाठी चे प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक करतो. भरभरून त्यांना शाब्बासकीची थाप देतो. त्यामुळे मुलांना एखाद्या गोष्टीविषयी ची आवड निर्माण होते.

कोरोनाच्या काळामध्ये हे आपल्याला सहज शक्य आहे. गेल्या वर्षभरापासून बऱ्याचदा आपण टाळेबंदी च्या काळामध्ये घरीच होतो. घरी राहून मुलांसोबत वेळ घालवून, आपण देखील त्यांच्या बाल वयामध्ये रममाण होऊन मुलांसोबत मुलांना शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला असतेच.

सारांश 

अशा पद्धतीने आपण मुलांमध्ये शिकण्याविषयाची आवड निर्माण करण्यासाठी अध्ययन शैली मुलांची कोणती आहे? मुलांना कशा पद्धतीने शिकवल्यानंतर किंवा शिकण्यासाठी प्रोत्साहित केले तर त्याला चांगले समजते? किंवा आवडते. या गोष्टीचा आपण शोध घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण मुलांना मनोरंजनात्मक खेळ,  नृत्य, वादन, गायन मुलांच्या आवडत्या कृती असतील, त्यातून मुलांना शिकण्याची आवड निर्माण करता येऊ शकते. सोबतच आपण मुलांसाठी वेळ देणे हे देखील तेवढेच फार महत्वाचे आहे. अशा पद्धतीने आपण मुलांच्या मध्ये शिकण्याविषयीची आवड निर्माण करू शकतो. त्यासोबतच मुलांच्या शिक्षणाविषयी प्रोत्साहन त्यांना देणे, त्यांना शाब्बासकीची थाप देणं, त्यांचं कौतुक करणं हे देखील तितकच महत्वाचे आहे, की जेणेकरून शिक्षणाविषयी मुलांमध्ये आवड निर्माण होईल.

Post a Comment (0)
Previous Post Next Post