महात्मा गांधी जयंती निबंध मराठी | Mahatma Gandhi Jayanti

महात्मा गांधी जयंती निबंध मराठी

2 october Mahatma Gandhi Jayanti निमित्ताने महात्मा गांधीजी यांच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत, त्यामध्ये Gandhi Jayanti निमित्त महात्मा गांधी जयंती निबंध तसेच महात्मा गांधी जयंती भाषण करण्यासाठी या लेखामधून आपणास मदत होईल. तेव्हा अवश्य संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा.


{tocify} $title={Table of Contents}


महात्मा गांधी जयंती निबंध मराठी | Mahatma Gandhi Jayanti

संपूर्ण जगाला सत्य अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती दरवर्षी 2 ऑक्टोंबर रोजी  मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना प्रेमाने बापूजी असे म्हणत असे, हा दिवस आपल्या भारत देशात राष्ट्रीय सण म्हणून देखील साजरा केला जातो.

महात्मा गांधीजींनी आपल्या देशासाठी फार मोठा त्याग करून सत्य अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले. गांधीजींनी अस्पृश्यता तसेच जातीभेद न मानता सामाजिक समानतेला जास्त प्राधान्य दिले. देशातील गरिबी उच्चनीचता भेदभाव नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी या गोष्टीस गांधीजी नेहमी प्राधान्य देत,  त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोडो, सायमन गो बॅक असे आंदोलन तसेच अनेक सत्याग्रह केले. त्यांच्या या कार्यासाठी Gandhi Jayanti  साजरी केली जाते.

2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी दिल्लीतील राजघाट येथे असलेली गांधीजींची समाधी येथे शासनामार्फत मोठ्या उत्साहात मध्ये जयंती साजरी केली जाते. अनेक शाळा, महाविद्यालय, सरकारी तसेच खासगी कार्यालयात सुद्धा Mahatma Gandhi Jayanti साजरी केली जाते. विविध स्पर्धेचे आयोजन करून गांधी जयंती साजरी केली जाते. जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या गांधीजींची जयंती संपूर्ण जगभर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन'  म्हणूनही साजरा केला जातो.

महात्मा गांधीजी नेहमी म्हणत असे, तुम्ही  ''असे जगा की उद्या मरणार आहात, आणि असे शिका कि तुम्ही नेहमीसाठी आयुष्यभर जगणार आहात.''  या वाक्याला गांधीजींनी कृतीतून जगून दाखवून दिले.

महात्मा गांधी जयंती | Mahatma Gandhi Jayanti

महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोंबर रोजी दरवर्षी आपण साजरी करतो. महात्मा गांधी यांना "बापू" या टोपण नावाने आपण ओळखतो तसेच "राष्ट्रपिता" म्हणून ओळखतो. ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्याच्या दृष्टीने आले आणि राज्यकर्ते झाले .त्यांनी भारत देशातील संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीयांवर अन्याय जुलूम केला. खूप संपत्ती त्यांनी लुटली,व्यापारी दृष्टीने शेतकऱ्यांची लूट केली.त्यामुळे इंग्रज सरकारला विरोध करून देशातून हाकलून लावणे आवश्यक होते. त्यासाठी भारतीय लोकांच्या मनावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज राजवटीला विरोध करणारी भारतीय मने तयार करायची होती. त्याशिवाय भारतीयांना पर्याय नव्हता.हे कार्य करण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी अहिंसा,सत्य,शांती च्या मार्गाने ब्रिटिश सरकारला भारतातून माघारी लावणे साठी कार्य हाती घेतले होते. १९२० सालानंतर भारतीय लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. त्यांनी असहकार, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या शस्त्राने राजकीय क्षेत्रात आपला चांगलाच ठसा उमटवला. ते स्वातंत्र्ययोद्धा तर होतेच परंतु समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, राजकीय विचारवंत, अस्पृश्य जणांचे उद्धारक, अर्थतज्ञ आणि कनवाळू राजकारणी होते. त्यांनी आपले सर्व जीवन देशसेवा करण्यात घातले. त्यांच्या विषयी अनेक पुस्तके लिहले गेले आहेत. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य खूप महान असून त्यांचे सर्व जगभरात एक थोर राष्ट्रभक्त आणि थोर नेता म्हणून ओळख आहे.

महात्मा गांधी यांचा परिचय | introduction of mahatma gandhi

महात्मा गांधी यांचे टोपण नाव "बापू" असे होते. 'राष्ट्रपिता' महात्मा गांधी 'राष्ट्रपिता' ही त्यांना दिलेली उपाधी आहे. त्यांची जगभरात 'राष्ट्रपिता' म्हणून एक वेगळी ओळख आहे.

महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात चळवळी चालू होत्या  चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते महात्मा गांधी यांना वडिलांप्रमाणे सन्मानाने वागवत असत. म्हणूनच ती सर्वांचे पिता समान आहेत .त्यामुळे  तशी त्यांची एक उपाधी निर्माण झाली आणि अहिंसेच्या मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. सुभाष चंद्र बोस यांनी 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना 'राष्ट्रपिता' असे संबोधले असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रह कल्पनेचे जनक होते.

संपूर्ण नाव  - मोहनदास करमचंद गांधी 

जन्म - 2 ऑक्टोबर 1869, पोरबंदर ,गुजरात 

आईचे नाव - पुतळाबाई करमचंद गांधी 

वडिलांचे नाव - करमचंद उत्तमचंद गांधी 

पत्नी - कस्तुरबा गांधी 

मृत्यू - 30 जानेवारी 1948 , नवी दिल्ली , भारत 

महात्मा गांधी यांचे बालपण | mahatma gandhi childhood

महात्मा गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. महात्मा गांधीजींचे शिक्षण पोरबंदर येथील शाळेमध्ये झाले. महात्मा गांधीजींनी वकील व्हावे असा त्यांच्या घरच्यांचा आग्रह होता. महात्मा गांधीजी हे खूप धार्मिक वातावरणात वाढलेले व्यक्तिमत्व होते. महात्मा गांधीजीच्या बालपणापासूनच सहिष्णुता ,शाकाहार ,शांतता इ. प्रभाव होता. इतर व्यक्तींविषयी आदर, आपुलकी यांची बीज मनात पेरलेले होते. जैन धर्माचा प्रभाव त्यांच्या विचारावर होता. प्राचीन वाग:मय यातील श्रावण बाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा गांधीजींवर गहिरा परिणाम दिसून येतो. कारण त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले आहे. ते लिहितात की "त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंद्र सारखा वागलो असेल" गांधीजींच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणांची ओळख झाली होती . 

इसवी.सन1883 मध्ये तेराव्या वर्षी महात्मा गांधीजींचा बालविवाह कस्तुरबा यांच्यासोबत झाला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचे वय सारखेच होते. पण त्या काळात रितीरीवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या. मोहनदास यांना शाळेचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या आठवणी बद्दल त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक शाळेत तसेच  माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांची वर्तणूक चांगली होती.हस्ताक्षर खराब होते. ते मॅट्रीकपर्यंत तेथेच शिकले. गांधीजी यांचे वडील राजकोटला तेव्हा नव्हती त्यांच्या आईने त्यांना लहानपणीच सत्य अहिंसेचे शिक्षण दिले रामायण महाभारताचे वाचन करावयास लावली होती विद्यार्थीदशेत काही वाईट मित्रांच्या संगतीने गांधीजीनी चुका केल्या त्यांनी आपली चूक वडिलांजवळ करून करून क्षमा मागितली व नंतर त्याच चुका पुन्हा कधी केले नाहीत महात्मा गांधी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले. आफ्रिकेत  जाऊन वकिली केली.तेथे त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले.

महात्मा गांधींनी लिहिलेले पुस्तके | Mahatma Gandhi books written

  1. गांधी विचार दर्शन (सत्याग्रह प्रयोग )
  2. गांधी विचार दर्शन( सत्याग्रह विचार)
  3. गांधी विचार दर्शन (सत्याग्रहाची जन्मकथा) 4.गांधी विचार दर्शन- ( हरिश्चंद्र )
  4. इंडियन होम रुल 
  5. गांधीजीची संक्षिप्त आत्मकथा 
  6. गांधीजीचे अहिंसाविचार
  7. गांधी विचार दर्शन अहिंसा विचार 
  8. गांधी विचार दर्शन राजकारण 
  9. नैतिक धर्म 
  10. माझ्या स्वप्नाचा भारत



महात्मा गांधीजी यांचे सामाजिक कार्य | Gandhi Jayanti  as a social reformer

महात्मा गांधी यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आणि विस्तृत असून त्यांच्या कार्याविषयी माहिती समाजसुधारक महात्मा गांधीजी यांचे सामाजिक कार्य समजून घेऊया.

महात्मा गांधी केलेल्या चळवळी

  • असहकार चळवळ
  • खिलाफत चळवळ 
  • जनांदोलन सविनय 
  • कायदेभंगाची चळवळ 
  • चलेजाव चळवळ

महात्मा गांधी यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने तीन महत्त्वाच्या चळवळी इंग्रज सरकारच्या विरोधात केल्या होत्या.त्या चळवळीमुळे इंग्रज सरकारला " सळो की पळो" करून सोडले .

असहकार चळवळ | Non-cooperation movement

लोकमान्य टिळकांचा 1920 सली मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय सभेचे सर्व सूत्र महात्मा गांधी यांच्या हाती आले. ब्रिटिश अधिकारी रौलट याने एक नियम केला भारतीयांना विनाचौकशी अटक करण्याचा त्या रौलट कायद्याविरोधात  ब्रिटिश सरकारला वठणीवर आणण्यासाठी वेगवेगळ्या चळवळी सुरू करण्यात आल्या .त्यातील असहकार चळवळ म्हणजे ब्रिटिश सरकारला कोणत्याही प्रकारे सहकार्य करायचे नाही. भारतीय व्यक्तीने इंग्रज सरकारला मदत करायची नाही त्यांचे सर्व कामे बंद पडायची, असहकार स्वीकारायचा असा त्या चळवळीचा मुख्य उद्देश होता.

जालियनवाला बाग हत्याकांड | Jallianwala Bagh massacre

रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये जालियनवाला बाग येथे बैसाखी सणानिमित्त सभा भरली होती. त्यात गांधींना पंजाब मध्ये येण्यास सक्त मनाई ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने केली.त्याचवेळी जनरल डायर याने सभा बंदीचा आदेश काढून जलियानवाला बाग येथे सुरू असणाऱ्या सभेत निशस्त्र भारतीयांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला.त्यात अनेक भारतीय पुरुष ,महिला,मुले मारले गेले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला आणि तेव्हापासून असहकार चळवळ चा जन्म झाला.

खिलापत चळवळ | Khilapat movement 

पहिले महायुद्ध झाल्यावर तुर्कस्तान या देशावर अपमानास्पद तह लादले गेले. तुर्की साम्राज्याचे विघटन झाले. भारतीय मुस्लिम विक्षुब्ध झाले आणि त्यांनी खलीपाला पाठिंबा देण्याचे ठरवले. हिंदू मुस्लिम यांनी खलीपला पाठिंबा देऊन महात्मा गांधी यांच्या पुढाकाराने खिलापत चळवळ सुरू झाली.

जनआंदोलन | Mass Movement Mahatma Gandhiji

1920 सालच्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळ पाठिंबा देऊ केला.ब्रिटिश वस्तू , तसेच नोकऱ्या यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले गेले. अगदी त्यांच्या शिक्षण व्यवस्थेवर सुद्धा बहिष्कार टाकण्यात आला. यासाठी सर्व स्तरावरून प्रतिसाद मिळाला. सरकारी वकील यांनी कामावर बहिष्कार टाकले कामे बंद केले. त्यामुळे ब्रिटिश सरकारला समस्या येऊ लागल्या. उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथील निघालेल्या शांतेतील मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला . त्यानंतर महात्मा गांधींना अटक करण्यात आली.भारतीयांनी पोलीस चौकी पेटवून दिली. सगळीकडे आंदोलने सुरू झाली.त्यामुळे जनता आता ब्रिटिश सरकारला विरोध करू लागली.वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन उभारू लागले आणि ब्रिटिश सरकारला सर्व ठिकाणी विरोध केला जाऊ लागला.

सविनय कायदेभंग चळवळ | Civil Disobedience Movement

लाहोर येथील झालेले ठरावानुसार गांधीजींच्या नेतृत्वाखाली 14 फेब्रुवारी 1930 रोजी सविनय कायदेभंगाची चळवळ झाली'हिंसा न करता ब्रिटिश राजवटीचे कायदा मोडून काढणे आणि त्या संदर्भात शिक्षा भोगणे म्हणजेच सविनय कायदेभंग होय.'  मिठाचा सत्याग्रह हा राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार व दारू व करबंदी जंगल कायद्याची आणि सरकारी नोकरी मिळाल्यावर परकीय मालावर बहिष्कार मिठाचा सत्याग्रह मिठाच्या सत्याग्रहाने म्हणजेच दांडी यात्रेला या चळवळीची सुरुवात सुरुवात झाली . 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 या कालावधीमध्ये आपल्या 45 सहकाऱ्यांबरोबर साबरमती ते दांडी पर्यंत सुमारे 385KM चालून मिठाचा सत्याग्रह केला. या चळवळीस संपूर्ण देशभरातून पाठिंबा  मिळाला.

चलेजाव चळवळ | Chale Jav Movement

1942 साठी महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना "चले जाव " असा आदेश दिला आणि या आदेशाने भारतातील जनता पेटून उठली. ब्रिटिशांनो आता तुमचं या ठिकाणचे सगळे संपलेला आहे .आता तुम्ही तुमच्या देशात निघून जावे असा याचा संदेश महात्मा गांधींनी ब्रिटिशांना दिला .ब्रिटिशांविरुद्ध भारतातील जनता पेटून उठली. गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन सरकारी माहितीचा विध्वंस केला .कार्यालये तोडली . आता लोकांवर राज्य करणार तरी कसे ? असा प्रश्न ब्रिटीशांना पडायला लागला. त्यांनी भारत देश सोडून जाण्याच्या निर्णयाची प्रक्रिया सुरू केली. पाच वर्षांनी ते भारत सोडून गेले. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. म्हणून या चळवळीला  खूप महत्त्व दिले जाते.

महात्मा गांधीजी यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्वाचे योगदान लाभले. सामाजिक कार्यातून सत्य, अहिंसा च्या मार्गाने महात्मा गांधीजीनी ब्रिटीशांचे जुलमी कायदे रद्द करण्यास भाग पाडले. 

महात्मा गांधी यांचा मृत्यू | Death of Mahatma Gandhi

Mahatma Gandhi death date and place

30 जानेवारी 1948 ला दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची  नथुराम गोडसे याने गोळी मारून हत्या केली. 'राजघाट' येथे महात्मा गांधीजींची समाधी आहे. या समाधीवर  'हे राम' असे लिहिलेले आहे. त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण म्हणतात.

महात्मा गांधी जयंती | Mahatma Gandhi Jayanti

महात्मा गांधी जयंती ला वेगवेगळ्या सरकारी कार्यालयामध्ये तसेच वेगवेगळ्या शासनाच्या विभागांमध्ये गांधी जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आपापल्या स्तरावर आयोजन केले जाते. काही ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाते. काही ठिकाणी वेगवेगळी व्याख्याने, प्रतिमा पूजन ,ग्रंथप्रदर्शन, अशा विविध माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येते. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून परिसर स्वच्छ केला जातो. वेगवेगळ्या शासनाच्या मोहिमा राबवले जातात. शाळा संस्था महाविद्यालय या ठिकाणी शासनातर्फे वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मोठी व्याख्याने, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कृतीयुक्त अभिनय, एकांकिका ,नाटके, इत्यादी प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून, महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते.


Post a Comment (0)
Previous Post Next Post