शालेय शिक्षण टिलीमिली मालिका सह्याद्री कार्यक्रम 2021 | Tilimili Malika DD Sahyadri Programme 2021

Tilimili Malika DD Sahyadri Programme 2021


शालेय शिक्षण टिलीमिली मालिका सह्याद्री कार्यक्रम 2021| Tilimili Malika DD Sahyadri Programme 2021

टिलीमिली मालिका कार्यक्रम | Tilimili DD Sahyadri Programme

शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या शेवटापासून संपूर्ण जगभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याकारणाने टाळेबंदी मुळे तसेच कोरोनाच्या च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. अजूनही शाळा सुरळीतपणे सुरू होऊ शकलेल्या नाहीत, गेल्यावर्षी 14 मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षण सुरू ठेवण्यासाठी वेगवेगळे  ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय समोर येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग MKCL Knowledge Foundation परिवारा तर्फे प्रसारित होणाऱ्या "टिलीमिली" ही महामालिका आता यावर्षी देखील सुरू करण्यात आली आहे.

शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शासनामार्फत SCERT स्वाध्याय उपक्रम, SCERT अभ्यासमाला, शैक्षणिक वेबिनार, ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम तसेच दीक्षा ॲप च्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्येच आता डी डी सह्याद्री वाहिनीवरील ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक 14 जून 2021 पासून दररोज पाच तासांकरिता सुरू करण्यात आलेला आहे. याच ज्ञानगंगा शैक्षणिक उपक्रमाला सहयोग देण्यासाठी MKCL नॉलेज फाउंडेशन  (MKCL Knowledge Foundation) या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्ता च्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील दैनंदिन मालिकेद्वारे पुनःप्रक्षेपण मोफत देण्याचे ठरवले आहे.

मागील वर्षी राज्यातील सुमारे दीड कोटी मुला-मुलींना त्यांच्या घरी व शेजारच्या किंवा परिसरातील दूरचित्रवाणी TV टीव्ही वर निशुल्क मोफत या शैक्षणिक कार्यक्रमाचा लाभ घेता आला. त्याच प्रमाणे यावर्षी देखील घेतात येणार आहे Tilimili मालिका राज्यामध्ये 21 सप्टेंबर 2021 पासून इयत्ता पहिली ते आठवीच्या इयत्ता साठी सुरू झालेली आहे.

टिलिमिली मालिकेचे वैशिष्ट्य 

बालभारतीच्या इयत्ता पहिली ते आठवी पुस्तकातील प्रथम सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित Tilimili मालिका सुरू आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे कुठेही मुलांना कंटाळा वाटणार नाही. असे सलग व्याख्याने  नसून या मालिकेमध्ये मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील, अशा कृतीनिष्ठ  उपक्रमातून शैक्षणिक अनुभव दिले गेले आहेत.

मुलांना छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जावे. त्यासोबतच ताण-तणाव येऊ नये, यासाठी स्वच्छ मोकळे आणि आनंददायी वातावरणामध्ये भावनिक सुरक्षितता असेल व चुका करत स्वतःची अर्थ बांधणी स्वतः करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. यामुळे मुले हसत-खेळत स्वतःच कशी शिकतात? हे या मालिकेच्या प्रत्येक भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. अशी सहज आनंददायी व ज्ञानरचनावादी प्रक्रिया मुलांना टिलीमिली मालिकेच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. या टिलीमिली मालिकेच्या माध्यमातून मुलांना रोज स्वतः शिकण्यासाठी प्रेरणा स्फूर्ती देखील मिळत आहे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे.

टिलीमिली मालिका सह्याद्री कार्यक्रम

पहिली ते आठवी च्या प्रथम सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित दररोज १० भाग यानुसार प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येत आहे. आठ ही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील ४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झालेली आहे. सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त पण मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त ठरत आहे.

>> टिलीमिली मालिका सह्याद्री कार्यक्रम वेळापत्रक 2021

>> दिक्षा ॲप्स चा वापर कसा करावा?

■ SCERT स्वाध्याय २०२१ 

Post a Comment

Previous Post Next Post