ऑनलाइन शिक्षण पध्दती निबंध मराठी | Online Education Essay In Marathi

एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होत आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या कालावधीमध्ये शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आलेला आहे. संपूर्ण जगभरात ऑनलाईन शिक्षण पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर झाले यामध्ये सुद्धा तंत्रज्ञानावर ऑनलाईन शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. आजच्या या लेखांमध्ये 'ऑनलाईन शिक्षण' पद्धती समजून घेणार आहोत. 'ऑनलाईन शिक्षण' पद्धतीचे महत्त्व, ऑनलाईन शिक्षण काळाची गरज, ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे कोणते आहेत? या विषयी ऑनलाइन शिक्षण पध्दती निबंध लिहण्यासाठी आपणास मदत होईल.


Online Education Essay In Marathi{tocify} $title={Table of Contents}


ऑनलाइन शिक्षण पध्दती निबंध मराठी | Online Education Essay In Marathi

प्रस्तावना

'ऑनलाईन शिक्षण' ही पद्धत तशी खूप जुनी नाही, परंतु कोरोना महामारीच्या अगोदर अस्तिवात होती. हे मात्र नक्की सांगता येईल. जसे जगामध्ये डीजीटेलायझेशन वाढत गेले तसे 'Online education' ही संकल्पना उदयास येऊ लागली. कोरोना महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले . माणसाशी माणसाचा संपर्क तुटू लागला. लॉकडाऊन सारख्या संकल्पना उदयास आल्या.'ऑनलाईन शिक्षण पद्धती' भारतातील खेडेगावात राहणाऱ्या मुलांना तसेच पालकांना नवीन असल्याने त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. घरात राहूनच सर्व कामे करावे असा शासनाने नियम लावले त्यामुळे शिक्षण सुद्धा घरातून देणे घेणे आवश्यक झाले.प्रत्यक्ष शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम शासनाने सुरू केला.

ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय? | What is Online Education Methods?

ऑनलाईन शिक्षण पद्धती मध्ये  इंटरनेटच्या माध्यमातून Live Online Classes, Youtube , Apps , PPT, PDF, Google Classroom , Educational Videos इतर डिजिटल सेवेचा वापर करून टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप , संगणक साधनाच्या साहाय्याने शिक्षण घेणे म्हणजेच  ऑनलाईन शिक्षण पद्धती होय.

ऑनलाईन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते इंटरनेटचे जाळे, 'ऑनलाईन शिक्षण' ही खूप विस्तृत अशी संकल्पना आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये Online Shikshan खऱ्या अर्थाने प्रभावीपणे राबवण्यात येते. मात्र विकसनशील देशांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी काही मर्यादा येत आहे. मात्र 21 व्या शतकाची वाटचाल ही नक्कीच तंत्रज्ञानाने भरारी घेतलेली आहे, आणि भविष्यात Online Shikshan ही काळाची गरज बनून राहणार यात मात्र शंका नाही.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विविध पद्धतीने 'ऑनलाईन शिक्षण' देता येऊ शकते किंवा विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करता येऊ शकते. मात्र सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विशेषत: या कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गरज दिसून आली, यादरम्यान बहुतेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे पर्याय समोर आलेत त्यामध्ये दीक्षा App च्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण, व्हाट्सअप च्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम, अभ्यासमाला, टेलिव्हिजनच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम, वेगवेगळे शैक्षणिक वेबिनार मालिका द्वारे ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण सुरु ठेवण्यास मदत झाली आहे.

हे ही वाचा

>> SCERT स्वाध्याय उपक्रम 

>> ऑनलाईन शिक्षण

>> ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय

ऑनलाईन शिक्षणाचे महत्व | What is the important of online education?

'ऑनलाईन शिक्षण' ही एक काळाची गरज आहे. कारण कोरोना सारख्या भयंकर महामारी पासून बचाव होण्याच्या दृष्टीने सध्या सर्व जगभरात याचा उपयोग केला जात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे घरातून शिक्षण घेणे विद्यार्थ्यासाठी सोपे झाले. एका ठिकाणी बसून, आपल्या घरातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले तर त्यात काही वावगे नाही. ऑनलाईन शिक्षण पद्धती मध्ये मुले शाळेतील गोंगाट पासून मुक्त होऊ शकतात. एखादी संकल्पना समजली नाही. तर ती पालकांसोबत शेअर करून किंवा संबंधित शिक्षकाला नंतर फोन कॉल करून विचारू शकतात. ऑनलाईन शिक्षण पद्धती अशा महामरीच्या काळात खूप चांगला पर्याय समोर आला आहे.

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज | Online Shikshan Kalachi Garaj

जगात अनेक वेगवेगळ्या साथी चे आजार, महामारी येत असतात किंवा कोरोना सारख्या व्हायरल व्हायरस पासून बचाव होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षणाचे महत्व सर्वांना पटले आहे. त्याचा फायदा सुद्धा झालेला आपण पाहतो आहे. घरातून विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत नाही. शिक्षकांना सुध्दा या ऑनलाईन शिक्षण पद्धती चा फायदा घेता येऊ शकतो. फक्त इंटरनेट,तसेच लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारखे साधने वापरता येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सुध्दा डिजिटल साधनाची माहिती असावी लागेल. यापुढे देखील आता सर्वांनी 'ऑनलाईन शिक्षण' घेणे  घेणे सुरू ठेवणे आवश्यक आहे. घरात मुलांचा वेळ वाया न घालवता शिक्षण सुरु ठेवता येते. 

>> ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध

>> कोरोना काळातील शिक्षण

>> माझी शाळा निबंध मराठी  My School Essay in Marathi

ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय | Best online learning options

'ऑनलाईन शिक्षण' म्हंटले की, डोळ्यासमोर येते ते म्हणजे इंटरनेट चे जाळे मात्र ऑनलाईन शिक्षणाचे विविध पर्याय आहेत. कोरोनाच्या महामारी दरम्यान ऑनलाईन शिक्षण काळाची गरज बनली. आणि प्रत्येक जण ऑनलाईन शिक्षण कसे घ्यायचे? कसे द्यायचे? याचाच विचार करू लागला. या दरम्यान तंत्रस्नेही शिक्षक बांधवानी शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू केले. जिथे इंटरनेट सुविधा असेल, ज्या पालकांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असेल त्यांचे सर्वेक्षण करून मुलांसोबत ऑनलाईन क्लास सुरू केले. या दरम्यान ऑनलाईन शिक्षणाचे विविध पर्याय समोर आले. त्याची माहिती पाहूया.

ऑनलाईन क्लास | Online Classes

संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागल्यामुळे सर्वजण घरात राहून कोरोना सोबत जगू लागले. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढे आली. खाजगी, शासकीय कर्मचारी घरी राहून काम सुरू ठेवले, शाळा बंद असल्याने शिक्षकांनी ऑनलाईन क्लास सुरू केले. त्यामध्ये सुरुवातीला तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन गुगल मीट (Google Meet) तसेच झूम मिटिंग (Zoom Virtual Meeting) द्वारे मुलांसोबत ऑनलाईन क्लास सुरू केले. विशेषतः माध्यमिक स्तरावरील मुलांना याचा अधिक प्रभावी वापर झालेला दिसून येते. याच दरम्यान ऑनलाईन पध्दतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी ऑनलाईन व्हर्चुअल पध्दतीने आपले कलागुण सादर करू लागले.

ऑनलाईन शिक्षणाचे मूल्यमापन | Evaluation of online Education

लॉक डाऊनमुळे शिक्षण तर सुरू ठेवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत होतेच, यादरम्यान दहावी, बारावी परीक्षेचे मूल्यमापन करण्या संदर्भात शासनाने 25% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेऊन अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आले. ऑनलाईन व्हर्चुअल क्लास मध्ये शिकवलेल्या घटकांचे गुगल फॉर्म, Quiz तयार करून मुलांकडुन प्रश्नावली सोडवून घेतल्या. 

यूट्यूब लाईव्ह क्लासेस | Online Live Classes

21 व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. कोव्हीड 19 च्या दरम्यान याचा तीव्रतेने वापर करण्यात येत आहे. ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासेस बरोबर सोशल मीडिया YouTube चॅनेल तयार करून त्याद्वारे Live क्लासेस सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे Live क्लासेस घेतलेले कधीही विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा पाहून संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर एखादी संकल्पना समजली नाही तर विद्यार्थी नोट डाऊन करून ऑन कॉल द्वारे किंवा ऑनलाईन क्लासेस मध्ये शंकेचे निरासरण करता येते.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे | Benefits of online education

ऑनलाईन शिक्षण चे फायदे पुढीलप्रमणे
 1. ऑनलाईन शिक्षण घरातून घेता येते.
 2. शिक्षकांना सुद्धा घरातून शिक्षण किंवा तासिका घेता येतात.
 3. गोंगाट,वर्गातील गोंधळ यापासून मुक्त होऊन शिक्षण मिळेल.
 4. महामारी च्या काळात आरोग्याला धोका नाही.
 5. वेळेचा जास्तीत जास्त उपयोग होईल.
 6. शाळेसाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यासाठी इतर अनावश्यक खर्च कमी होईल.
 7. शाळेच्या इमारती, मनुष्यबळ ची गरज कमी होईल.
 8. पालकांच्या समोर विदयार्थी शिक्षण घेऊ शकतील.

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे | Disadvantages of online education

 1. विदयार्थी मुक्त वातावरणात न जाता चार भिंतीच्या आत बंदिस्त असल्याने इतर Skill Development होण्यात अडचणी येतात.
 2. मैदानी खेळ यापासून दुरावला जाईल
 3. ऑनलाईन शिक्षण घेण्यास अनेक मर्यादा आहे त्यातील मुख्य म्हणजे भारतासारख्या देशात internet connection उपलब्ध होत नाही.
 4. साहित्य साधने शिक्षकांना वापरता येणे आवश्यक असल्याने ते काही शिक्षकांना प्रभावीपणे वापर करता येत नाही .
 5. काही विद्यार्थी व पालक यांना साधने उपलब्ध करणे त्यावरील खर्च तसेच त्याचा वापर करणे परवडत नाही.
 6. इंटरनेट सेवा खूप महाग झाल्याने ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडत नाही.
 7. विद्यार्थ्यांतील एकमेकातील संपर्क होत नसल्या कारणाने कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट होत नाही त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर तसेच शरीरावरही होतो.
 8. अध्ययन अध्यापनात अनेक मर्यादा येतात समोरासमोर शिक्षक शिकवताना विद्यार्थी समोर मनातील प्रश्न लगेच विचारू शकतो आणि शंकेचे निरसन करू शकतो परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांनाही सर्व गोष्टी करणे अशक्य होऊ शकते.
 9. विद्यार्थ्यांचे Social skill Development होणार नाही.
 10. एकमेकांना संवाद साधने,शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम इ . वर मर्यादा येतील.
 11. भारतासारख्या अति दुर्गम भागात त्याचा प्रभावी वापर होणे जरा कठीण वाटते. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारी साहित्य साधने व त्याचा वापर करणे हे सर्वांना जमले पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post