टिलीमिली मालिका सह्याद्री कार्यक्रम वेळापत्रक 2021| Tilimili DD Sahyadri New time table 2021

Tilimili DD Sahyadri New time table 2021


टिलीमिली मालिका सह्याद्री कार्यक्रम वेळापत्रक 2021| Tilimili DD Sahyadri New time table 2021

शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शासनामार्फत SCERT स्वाध्याय उपक्रमSCERT अभ्यासमालाशैक्षणिक वेबिनारज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम तसेच दीक्षा ॲप च्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्येच आता डी डी सह्याद्री वाहिनीवरील ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक 14 जून 2021 पासून दररोज पाच तासांकरिता सुरू करण्यात आलेला आहे. याच ज्ञानगंगा शैक्षणिक उपक्रमाला सहयोग देण्यासाठी MKCL नॉलेज फाउंडेशन  (MKCL Knowledge Foundation) या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्ता च्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील दैनंदिन मालिकेद्वारे पुनःप्रक्षेपण मोफत देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व MKCL Knowledge Foundation परिवारा तर्फे प्रसारित होणाऱ्या "टिलीमिली" ही महामालिका आता यावर्षी देखील सुरू करण्यात आली आहे. टिलीमिली मालिका सह्याद्री कार्यक्रम वेळापत्रक 2021 (Tilimili DD Sahyadri New time table 2021) कसे असणार आहे याबद्दलची माहिती घेऊया, अवश्य आपल्या मुलामुलींना या संधीचा लाभ देण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि मुलांचे शिक्षण थांबून न राहता, शिक्षण असेच पुढे सुरु ठेवूया. त्यासोबतच ‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील "टिलीमिली" मालिकेचे वेगवेगळ्या डिश टीव्ही क्रमांकाची देखील माहिती पाहणार आहोत.

टिलीमिली मालिका सह्याद्री कार्यक्रम वेळापत्रक 2021| Tilimili DD Sahyadri New time table 2021

टिलीमिली मालिका दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे 

प्रत्येक सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक 

Tilimili DD Sahyadri New time table 2021

इयत्ता        वेळ
पहिली सकाळी ९.०० ते ९.३०
दुसरी सकाळी ९.३० ते १०.००
तिसरी  सकाळी १०.०० ते १०.३०
चौथीसकाळी १०.३० ते ११.००
पाचवी सकाळी ११.३० ते १२.००
सहावी दुपारी २.०० ते २.३०
सातवी दुपारी ३.०० ते ३.३०
आठवी दुपारी ३.३० ते ४.००
आठवी       दुपारी ४.०० ते ४.३०


टिलीमिली मालिका मंगळवार ते शुक्रवार प्रसारित होणाऱ्या भागांचे दैनंदिन  वेळापत्रक खालीलप्रमाणे

Tilimili DD Sahyadri New time table 2021

इयत्ता       वेळ
पहिलीसकाळी ९.०० ते ९.३०
दुसरीसकाळी ९.३० ते १०.००
तिसरी सकाळी १०.०० ते १०.३०
चौथीसकाळी १०.३० ते ११.००
पाचवीदुपारी १.३० ते २.००
सहावीदुपारी २.०० ते २.३०
सातवीदुपारी ३.०० ते ३.३०
आठवी दुपारी ३.३० ते ४.००
आठवी      दुपारी ४.०० ते ४.३०


टिलीमिली मालिका कार्यक्रम विषयी अधिक जाणून घेण्यसाठी भेट द्या. https://tilimili.mkclkf.org/about-tilimili

'सह्याद्री' दूरदर्शनवरील "टिलीमिली" मालिकेचे डिश टीव्ही क्रमांक

‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील "टिलीमिली" ही महामालिका | Tilimili DD Sahyadri Channel
  • डिश टीवी वर १२२९ 
  • टाटा स्काय वर १२७४ 
  • एअरटेलवर ५४८  
  • व्हिडिओकॉन d2h वर ७६९ 
  • डीडी फ्री डिश वर ५२५ 
  • हाथवे वर ५१३ 
‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील "टिलीमिली" ही महामालिका वरीलप्रमाणे क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post