District Court Answer Key 2024 : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयाच्या (District Court Recruitment Maharashtra) आस्थापनेवरील पदांच्या परीक्षेची Answer Key उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
$ads={1}
मोठी अपडेट! जिल्हा न्यायालय भरती Answer Key जाहीर
जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाइन भरती प्रक्रिया २०२३ मधील लघुलेखक (पेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांसाठीची जाहिरात दि. ०४, डिसेंबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दि. ५, ७, ८, १२ आणि १४ फेब्रुवारी २०२४ रोजी लघुलेखक (ग्रेड -3) वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी स्क्रिनिंग चाचणी घेण्यात आली, सदरच्या स्क्रिनिंग चाचणीच्या उत्तर- तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉगिनमध्ये दिनांक ०२/०३/२०२४ ते ०४/०३/२०२४ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सदर उत्तर-तालिकेतील प्रश्नांसंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास, उमेदवारांनी दिनांक ०२/०३/२०२४ (सकाळी ८.००) ते ०४/०३/२०२४ (रात्री ११.५५) या कालावधीत त्यांच्या लॉगिन मधून प्रश्नासंबधी हरकती, त्यांच्या हरकतींचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेख्यासह / ऑनलाइन वेबलिंक्स इ. सोबत, ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात, असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
वरील विहित ऑनलाइन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती, कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवाराच्या लॉगिनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल. उमेदवारांनी याची नोंद घावी.
District Court Answer Key 2024 : Click Here
Official Website : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे येथे आयोजनमहत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल; अधिसूचना जारी
महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.