D.L.Ed. Exam December-2023 Result Declared : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड्.(D.L.Ed.) डिसेंबर-2023 परीक्षेचे आयोजन दि. 13 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दि. 07 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 02.00 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepune.in) जाहीर करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळेल व उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी दि.22 फेब्रुवारी 2024 अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अनुराधा ओक यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांसोबत आता शिक्षकांचीही परिक्षा घेतली जाणार
विशेष मुलांसाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश