Krushi Vibhag Bharti 2023 : कृषी विभाग भरती परीक्षा 21 सप्टेंबर पासून सुरु होणार, परीक्षा हॉल तिकीट जाहीर, डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक पहा

कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदांकरीता जाहीरात दि. ३ एप्रिल, २०२३ ते ६ एप्रिल, २०२३ रोजी प्रसिद्ध झालेली होती. सदर जाहिरातीस अनुसरुन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यानुषंगाने Krushi Vibhag Bharti 2023 Exam Date ऑनलाईन परीक्षा दिनांक. २१, २२ व २५ सप्टेंबर, २०२३ रोजी राज्यातील नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजीत करण्यात आलेली असून, परीक्षेचे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे, खाली दिलेल्या लिंकवर डायरेक्ट डाउनलोड करा, सोबतच माहिती पुस्तिका पहा.

कृषी विभाग भरती परीक्षा हॉल तिकीट जाहीर

krushi-vibhag-bharti-hall-ticket

कृषी विभाग परीक्षेसाठी उपलब्ध परीक्षा केंद्र व तेथे उपलब्ध बैठक व्यवस्था याचा विचार करुन काही परीक्षा केंद्राची निवड केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नजीकच्या जिल्हयातील परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आलेले आहे, त्यानुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र (Hall Ticket) कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

Krushi Vibhag Bharti 2023 Exam Date


उमेदवारांसाठी परीक्षेचे स्वरुप व इतर बाबींच्या अनुषंगाने माहिती पुस्तिका विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून सदर उमेदवारांनी माहिती पुस्तिका डाऊनलोड करुन माहिती पुस्तिका व प्रवेशपत्रावरील सूचनांचे काळजीपुर्वक वाचन करुन तंतोतंत पालन करावे. असे विभागाच्या वतीने परिपत्रक काढून कळविण्यात आले आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post