महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET Exam Result) निकाल अखेर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आला आहे. मागील वर्षी दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या TET परीक्षेचा हा निकाल mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” (RTE Act 2009) मधील तरतूदीनुसार सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ ली ते ८ वी) “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) अनिवार्य करण्यात आलेली आहे.
हे सुध्दा वाचा
टीईटी परीक्षा निकाल | MAHA TET EXAM Result
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २१/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)- २०२१ पेपर (इ.१ली ते ५ वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा अंतरिम निकाल परिषदेच्या mahatet.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
टीईटी परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे दि. ०५/११/२०२२ पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती उमेदवारांना नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०५/११/२०२२ पर्यंत mahatet21.msce@gmail.com या ईमेल वर पाठवण्याबाबत कळविले आहे.
दिनांक ०५/११/२०२२ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा तसेच ईमेल व्यतिरिक्त अन्य मार्गाने आलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
TET परीक्षा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे सुध्दा वाचा