NMMS Exam शिष्यवृत्ती परीक्षा योजना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS Exam Date Maharashtra) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी जाहीर केली आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु.१०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2022 या शैक्षणिक वर्षातील NMMS Exam दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येणार असून परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येणार आहे.
NMMS परीक्षा संपूर्ण माहिती | NMMS Exam Information in Marathi येथे वाचा
NMMS परीक्षा ऑनलाईन अर्ज 2022 | NMMS Exam Online Apply 2022
NMMS परीक्षा ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत मार्गदर्शन सूचना :-
दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध झाले आहे.
- ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व (अपंगत्व) प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. (दिव्यांग प्रकार व अपंगत्व प्रमाणपत्र माहिती येथे वाचा)
- मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे.
- अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही.
- ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगीनवरुन Edit करता येईल.
- प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, याची नोंद घ्यावी.
- सविस्तर माहिती परिषदेच्या https://www.mscepune.in/व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
NMMS परीक्षा Hall Ticket 2022 | NMMS Exam Hall Ticket 2022
प्रवेशपत्रे ऑनलाईन फॉर्म शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या व https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉगीनवर परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उपलब्ध होतील. सदर प्रवेशपत्रे काढून घेऊन विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.