डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी | APJ Abdul Kalam Mahiti Marathi

APJ Abdul Kalam Mahiti Marathi


{tocify} $title={Table of Contents}


डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी | APJ Abdul Kalam Mahiti Marathi

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय | Dr. APJ Abdul Kalam Life introduction

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम म्हणजे जगाला मिळालेली एक बहुमोल देणगीच होय. कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगल्या कार्यासाठी खर्च केलेला दिसून येतो. म्हणूनच त्यांना आपण "मिसाईल मॅन" असे म्हणतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी भारतीय लोकांची वेगळी ओळख जगामध्ये दाखवून दिली. भारतातील एक लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच आपले पाहिलेले स्वप्न पूर्णच करण्याची जिद्द ठेवणारे डॉक्टर अब्दुल कलाम तसेच त्यांचे विचार यापुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरित ठरतील.

APJ Abdul Kalam हे व्यक्तिमत्त्व जगभरात प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणी वर मात करून जगासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व सर्वांसमोर उभे केले. दुर्दैवाने ते आज आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांचे विचार , त्यांचा आदर्श असंख्य लोकांसमोर उभा आहे.त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तके वाचायला मिळतील. त्यांनी तयार केलेले अग्नि आणि पृथ्वी क्षेपणास्रामुळे देशाची सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत मिळालेली आहे. तसेच जगासमोर एक आपल्या देशाचा आदर्श निर्माण करून दिला आहे.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती | APJ Abdul Kalam Information

Dr. APJ Abdul Kalam यांचे पूर्ण नाव अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम  आणि आईचे नाव आशिमा जैनुलाब्दिन असून, वडिलांचे नाव जैनुलाब्दिन मारकयार आहे. 

डॉ अब्दुल कलाम यांचे शिक्षण १९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून, एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली आहे.

संपूर्ण नाव :-            अब्दुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम
जन्म         :-  15 ऑक्टोंबर 1931
मृत्यू          :- 27 जुलै 2015
जन्मस्थान  :- रामेश्वर,तामिळनाडू,भारत
वडिलांचे नाव   :-    जैनुलब्दीन
आईचे नाव     :- आशिमा जैनुलाब्दिन
पत्नी         :- अविवाहित
भाऊ         :- चार भाऊ
शिक्षण        :- एरोनॉरिकल इंजिनीअर
धर्म      :- इस्लाम
राष्ट्रीयत्व        :- भारतीय

डॉ.अब्दुल कलाम यांचे शिक्षण | Education Of APJ Abdul Kalam


Dr. APJ Abdul Kalam यांचे प्राथमिक शिक्षण रामेश्वरम् शाळेत झाले. पुढील शिक्षण रामनाथपुरम मधील चार्ट हायस्कूल मधून झाले . डॉक्टर अब्दुल कलाम यांचे नाव शिक्षक अयादुराई  शलमोन  होते. 1950 मध्ये इंटरमीडिएट शिक्षण घेण्यासाठी तिरुचिरापल्ली सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याठिकाणी भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास केल्यानंतर बी. एस. सी. साठी प्रवेश घेतला ते पूर्ण केल्यावर त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय न निवडता इंजीनियरिंग मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश घेतला.
     त्याठिकाणी त्यांनी पहिले वर्ष पूर्ण करून, तसेच मतदानाविषयी अभ्यास पूर्ण करून एरोनॉटिकल इंजीनियरिंग ला आपला विशेष विषय म्हणून पदवी नंतर ते हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड बेंगलोर येथे रवाना झाले . तेथे त्यांनी विमानांच्या इंजिनचे देखभालीचे चे कार्य हाती घेतले. त्यांचा अभ्यास सुरू केला. पिस्टन वर टरबाइन इंजिन मशीन वर त्यांनी विशेष अभ्यास करून प्रत्यक्ष काम केल्यानंतर रेडियल इंजिन व ड्रम ऑपरेशन चे प्रशिक्षण घेतले. 

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य 


शिक्षण पूर्ण केल्यावर सर्वप्रथम डी आर डी ओ मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरू केले. तेथे त्यांनी एक छोट्या हेलिकॉप्टर चे डिझाईन तयार केले. नंतर इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च चे काही काळ सदस्यत्व स्वीकारून, 1962 मध्ये  त्यांचे ISRO जवळचे संबंध आले. अग्नीपृथ्वी सारख्या मिसाईल ची निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊन हे काम त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्यांना 1992 ते 1999 मध्ये भारताचे रक्षा मंत्री म्हणून काम पाहावे लागले.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम भारताचे 11 वे राष्ट्रपती  | 11th President of India Dr. APJ Abdul Kalam 

18 जुलै 2002 रोजी Dr. APJ Abdul Kalam  यांना भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. त्यांना 25 जुलै 2002 रोजी संसद भवन येथे राष्ट्रपती ची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाल 25 जुलै 2007 रोजी समाप्त झाला . त्यानंतर त्यांनी संशोधन, लेखन, अभ्यास करून सामाजिक सेवा यामध्ये सहभाग घेतला. भारतातील अनेक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित संस्थांना त्यांच्या कार्यातून त्यांना मार्गदर्शन करून अनेक ठिकाणी विज्ञान-तंत्रज्ञान यांचे शिक्षण त्यांनी दिले. भारतातील अनेक संस्थांना त्याच्या ज्ञानाचा फायदा झाला डॉ.कलाम हे एक विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व होते.मुलांना अनेक क्षेत्रात सहभागी करून घेण्यासाठी,त्यांच्या प्रगतीसाठी ते जागरूक होते. हे सर्व कार्य करत असताना ते स्वतः शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असत.त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असत.

डॉ.अब्दुल कलाम यांचे पुस्तके | Abdul Kalam Books In Marathi


  (खालील पुस्तके मराठीत अनुवादित आहेत)
  डॉ. अब्दुल कलाम हे फक्त शास्त्रज्ञच नव्हते , तर ते एक उत्तम लेखक सुद्धा होते . त्यांनी अनेक वेगवेगळे पुस्तक लिहिलेले आहेत त्यामध्ये काही पुस्तके खालीलप्रमाणे
  1. अदम्य जिद्द
  2. ईग्नाईटेड माइंड्स
  3. इंडिया2020
  4. इंडिया माय ड्रिम
  5. उन्नयन
  6. विंग्ज ऑफ फायर
  7. सायंटिस्ट टू प्रेसिडेन्ट
  8. दिपस्तंभ

डॉ.अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार


पद्मभूषण, भारतरत्न, इंदिरागांधी पुरस्कार, डॉक्टर ऑफ इंजीनियरिंग ,वीर सावरकर पुरस्कार ,डॉक्टर ऑफ सायन्स इत्यादी.

डॉ.अब्दुल कलाम यांचे विचार | Motivational Thoughts of dr apj abdul kalam In Marathi


जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करायला शिका.

स्वप्ने ते नाहीत जे आपण झोपेत पाहतो , स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत.

कृत्रिम सुखा ऐवजी ठोस कामगिरीसाठी समर्पित व्हा.

जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहात नाहीत तोपर्यंत कोणीही तुमचा आदर करणार नाही, या जगात भीतीला स्थान नाही , केवळ सामर्थ्य सामर्थ्याचा आधार करत असते.


डॉ.अब्दुल कलाम यांचे निधन | Death of apj abdul kalam

27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी अब्दुल कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे राहण्यायोग्य ग्रह या विषयावर व्याख्याने देत असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले, त्यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर दोन तासांनी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी रामेश्वरम् येथे पैतृक अंत्यसंस्कार करण्यात आले.सर्व जगासमोर एक आदर्श व्यक्ती त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य जगाला अविस्मरणीय राहील.


वाचन प्रेरणा दिन विशेष माहिती व उपक्रम येथे वाचा 

हे ही वाचा


Post a Comment (0)
Previous Post Next Post