नारळी पौर्णिमा सणाची माहिती

सण उत्सव म्हटलं की आनंदाचा क्षण संस्कृती रूढी परंपरा नुसार सण-उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा / रक्षाबंधन हा एक महत्त्वपूर्ण सण साजरा केला जातो. आज आपण नारळी पौर्णिमा सणाची माहिती पाहूया.

{tocify} $title={Table of Contents}

नारळी पौर्णिमा सणाची माहिती | Narali Paurnima 

नारळी पौर्णिमा सण कोठे साजरा केला जातो ?

श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाच्या लगेचच येणारा सण कोणता? तर तो म्हणजे नारळी पौर्णिमा समुद्राकाठी राहणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा महत्वाचा सण. महाराष्ट्राला ७२० किमी चा समुद्र किनारा लाभलेला आहे. या समुद्रकिनारी कोळी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. कोकण किनारपट्टी म्हणून देखील याला ओळखले जाते. कोळी बांधवांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होय.

पावसाळा सुरु झाला कि, मासेमारी करणे थांबवले जाते. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे नौका सुरक्षित रहाव्यात. कोळी बांधव या दिवशी समुद्र शांत होण्यासाठी समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात. 

नारळी सणाचे महत्व


नारळी पौर्णिमेचा अर्थ

श्रावण पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ असे म्हणतात. कारण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात कोळी बांधव साजरा करतात. नारळी पौर्णिमा चा अर्थ नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेचा दिवस असा नारळी पौर्णिमेचा अर्थ होतो. समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात.

नारळी पौर्णिमेला वरूणदेवतेचे पूजन

नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यात पावसाळा संपत येतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेव प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात.  वरून देव म्हणजे काय? समुद्र देव, पाऊस देवता म्हणजेच वरून देव असं म्हणतात. वरून देव प्रित्यर्थ समुद्राची पूजा करून वरुणदेवतेला नारळ अर्पण केला जातो. 

नारळ अर्पण करण्यामागचे कारण

नारळ हे फळ शुभसूचक आहे. तसेच सर्जन शक्तीचे ही प्रतीक मानले जाते, नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा, नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात.

नारळ अर्पण करण्यामागचे विज्ञान 

पूजाविधीत नारळाला फार महत्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. ‘श्री’ म्हणजे लक्ष्मी आणि ‘फळ’ म्हणजे ‘नारळ’ नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. शरीराचा दाह म्हणजेच उष्णता कमी करण्यासाठी तसेच इतर आरोग्यदायी लाभ नारळाच्या खोबऱ्यापासून मिळतात. म्हणून नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.

नारळी सणाचे महत्व

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते. चंद्र पृथ्वीवर जलमय गोष्टी आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या शरीरावर सुद्धा याचा परिणाम होत असतो. बहुतांश सण हे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच येतात. आणि समुद्रामध्ये पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या मोठ्या लाटांचा प्रभाव जाणवतो.

 तर पौर्णिमेच्या दिवशी यमलहरी म्हणजे मोठ्या लाटा त्यांचे प्रमाण समुद्रात वाढते. या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून नारळ अर्पण करून समुद्राच्या यमलहरी ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भरसमुद्रात मासेमारीला निघतो. त्या कोळी महिलांची मदार सागर देवावर असते. त्यामुळे कोई महिलांच्या दृष्टीने या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमा निमित्त खास बनवलेला नारळाच्या करंज्या, याचा नैवेद्य समुद्र व बोटीला दाखवला जातो. समुद्राची यथासांग पूजा करण्यात येते. खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुघलक म्हणजे भरपूर मासोळी घाऊ दे, असे घराणे आणि बघीनी समुद्राला घालतात. 

समुद्राला नारळ अर्पण कसा करावा?

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकू नका, तर हळूवारपणे सोडा नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात ते करतांना काही जण पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही. म्हणून तो भावपूर्ण हळुवार पाण्यात सोडावा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post