रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha Bandhan Nibandh In Marathi

Raksha Bandhan Nibandh In Marathi : श्रावण महिन्यातील 'रक्षाबंधन' हा भारत देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. भारतात वेगवेगळ्या भागात यास वेगवेगळी नावे आहेत. जसे- नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा इ. 'रक्षाबंधन' हा भाऊ-बहिणीचा सण आहे.

रक्षाबंधन कधी साजरे केले जाते?

रक्षाबंधन वर निबंध

रक्षाबंधन हा एक हिंदू आणि जैन सण आहे, जो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. श्रावणा मध्ये साजरा केला जात असल्यामुळे याला श्रावणी किंवा नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा असेही म्हणतात. 

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावांच्या उजव्या हाताच्या मनगटावर पवित्र धागा म्हणजेच राखी बांधते. आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची शुभेच्छा देते. तर दुसरीकडे भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतो. राख्या कच्च्या कापूससारख्या स्वस्त वस्तूंपासून रंगीबेरंगी रेशीम धागा आणि सोने किंवा चांदीसारख्या महागड्या वस्तूंपर्यंत असू शकतात. मात्र रक्षाबंधनाची व्याप्ती यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. राखी बांधणे हा आता फक्त भाऊ-बहिणीचा सण राहिलेला नाही. देशाचे रक्षण, पर्यावरणाचे रक्षण, हितसंरक्षण आदींसाठीही राखी बांधली जात आहे.

रक्षाबंधनाचे महत्व

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याची पूर्वी पासून चालत आलेली जुनी परंपरा आहे. रक्षाबंधन हे संरक्षणाचे नाते आहे, जिथे सर्व बहिणी आणि भाऊ एकमेकांच्या संरक्षणाची, प्रेमाची आणि कर्तव्याची जबाबदारी घेतात आणि अनेक शुभेच्छा देऊन रक्षाबंधन साजरे करतात. जैन धर्मातही राखीला खूप महत्त्व आहे. ज्यांना बहिणी राखी बांधतात तेच त्यांचे खरे भाऊ असावेत असे नाही, मुली सर्वांना राखी बांधू शकतात आणि प्रत्येकजण त्यांचा भाऊ बनतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याला शुभेच्छा देते. भाऊ तिला कोणत्याही परिस्थितीत संरक्षण देण्याचे वचन देतो. अशा प्रकारे, रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या निखळ स्नेहाचा सण आहे.

रक्षा म्हणजे रक्षण, तर बंधन म्हणजे धागा, रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजे 'रक्षाबंधन' होय. या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर टिळा लावून हाताच्या मनगटावर राखी बांधते. भावाला ओवाळते. भावाच्या सुखी, निरोगी, आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. 

भाऊ देखील या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. प्रत्येक भाऊ-बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य स्थान आहे. या दिवशी बहीण भावाला गोड पदार्थ खाऊ घालते. व भाऊही आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.

रक्षाबंधन पौराणिक कथा

'रक्षाबंधन' या सणामागे अशीही कथा आहे. की महाभारतात कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून, तिचे सदैव रक्षण केले. तर द्रौपदीने ही शिशूपालाचा वधा वेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साडी चा तुकडा फाडुन जखमेवर बांधला. अशी कथा आहे.

आज बाजारात अनेक प्रकारच्या मनोवेधक राख्या मिळतात. प्रत्येक जण आपापल्या परीने राख्यांची खरेदी करतो. इंटरनेटच्या माध्यमातून तसेच कुरियरच्या माध्यमातून ऑनलाईन राखी पाठवली जाते. रक्षाबंधन हा सण फक्त भावा बहिणी पुरताच मर्यादित राहिला नाही. तर गुरु-शिष्य, आई-वडील, चुलत भाऊ-बहीण मानलेला भाऊ-बहीण इ. त्यामध्येही साजरा केला जातो.

रक्षाबंधन सणा चा विस्तार इतर नात्यांमध्ये ही होताना दिसून येत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आई वडिलांना मुले राखी बांधून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. त्यामुळे भविष्यात वृद्धाश्रमांची संख्या कमी होईल. 

शिष्य गुरूंना राखी बांधून त्यांच्या विचारांचे रक्षणाची जबाबदारी घेतात. झाडेझुडपे यांनाही हल्ली राखी बांधली जाते. जेणेकरून वृक्षतोड कमी होऊन वृक्ष प्रेम वाढेल, आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात रक्षाबंधन हा पवित्र सण आपले आगळे वेगळे अस्तित्व राखून आहे. 

रक्षाबंधन हा सण शील, स्नेह पवित्रतेचे रक्षण करणारा सण आहे. तो मनापासून प्रत्येकाने जपला तर निश्चितच भविष्यात अत्याचार, बलात्कार, वृद्धाश्रमात अशा अनेक समस्या नक्की कमी होतील.

सर्व भाऊ-बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेछ्या !

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now