फिट इंडियाचे उद्दिष्टे
- फिटनेस ला सोप्या आणि सहज पद्धतीने प्रोत्साहन देणे.
- विविध शारीरिक कृती हालचाली तसेच फिटनेस यावर लक्ष केंद्रित करणे. तसेच त्याविषयी जनजागृती करणे.
- प्रत्येक शाळा महाविद्यालय गावांमध्ये स्वदेशी खेळा विषयी जनजागृती करणे व प्रोत्साहन देणे.
- भारतीय नागरिकांसाठी त्यांच्या फिटनेस बद्दल सजग राहण्यासाठी त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करणे तसेच त्यांना स्वतःची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना प्रेरित करणे.
फिट इंडिया फ्रीडम रन २.० कार्यक्रमास दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी सुरुवात झाली आहे. आझादी का अमृत महोत्सव #AzadikaAmritMahotsav अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन २.० #FitIndiaFreedomRun2.0 कार्यक्रम 13 ऑगस्ट 2021 ते 2 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा उपक्रम संपन्न होत आहे. 51 दिवसांच्या या कालावधीत विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. वास्तव्याच्या ठिकाणी किंवा जिथे शक्य आहे तेथे running करून या उपक्रमात सहभागी होऊन त्याबाबतचे फोटो/ व्हिडिओ https://fitindia.gov.in या पोर्टलवर अपलोड करावेत.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत fit India freedom run 2.0 हा उपक्रम संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येत आहे. सदर उपक्रमाची सुरुवात 13 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्रात, मुंबईतले ऑगस्ट क्रांती मैदान, पुण्यातला आगाखान पॅलेस, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान, वर्धा इथला सेवाग्राम आश्रम, नागपूर मधला सीताबुल्डी किल्ला तसेच अकोला, गोंदिया आणि चंद्रपूर इथल्या ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणाहून फिट इंडिया फ्रीडम रन २.० कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. देशभरात 75 ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे.
शालेय स्तरावर शाळा सुरू करण्यात आली असेल तर कोविड बाबत सर्व नियमांचे पालन करून या उपक्रमाचे आयोजन करावे व उपक्रमाचे फोटो/ व्हिडिओ पोर्टल वर अपलोड करण्यात यावेत. यासाठी शाळा स्तरावर एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्याकडे या उपक्रमाचे जबाबदारी सोपविण्याबाबत कळविण्यात आले आहे.
FIT India च्या पोर्टलवर फोटो/ व्हिडिओ अपलोड करण्याची पद्धती
>> 3 स्टार व 5 स्टार Flagship साठी शाळेची नोंदणी फिट इंडियाच्या पोर्टलवर केलेले असल्यास नोंदणी करताना Create केलेला लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून FIT India च्या पोर्टल वर लॉग इन करावे.
Fit India Log In
{getButton} $text={Fit India Portal} $icon={link} $color={Hex Color}
>> 3 स्टार व 5 स्टार Flagship साठी शाळेचे नोंदणी फिट इंडियाच्या पोर्टलवर केली नसल्यास पुढील लिंक द्वारे शाळेचे नोंदणी करून घ्यावी. https://fitindia.gov.in/register
Fit India Log Register
{getButton} $text={Fit India Register} $icon={link} $color={Hex Color}
>> login केल्यानंतर Registerd as : school असा मेसेज व आपल्या शाळेचे नाव दिसेल
>> डाव्या कोपऱ्यात टेबल मध्ये Fit India school certification, organise an even, my event व my event pics असे चार पर्याय दिसतील
>> या पर्यायांमध्ये orgnise an even, या पर्यायावर क्लिक करावे
>> त्यानंतर Event name, organisation, email id, contact number त्यादी फील्डमध्ये आपल्या शाळेची माहिती दिसेल.
>> आपलो इमेज या फिल्ड वर क्लिक करून उपक्रमाचा फोटो अपलोड करता येईल.
>> अपलोड लिंक या फिल्डमध्ये उपक्रमाच्या व्हिडिओची लिंक अपलोड करता येईल.
>> आपल्याला अधिक फोटो किंवा व्हिडिओ च्या लिंक अपलोड करायच्या असल्यास Add more वर क्लिक करून फोटो व व्हिडीओ लिंक अपलोड करता येईल.
तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण भारताचा संकल्प प्रत्येक नागरिकाने करावा असे करत आवाहन तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण भारतच बलवान भारत असेल असे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्र्यांनी जनतेला दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या तंदरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यापासून मुक्तता मिळवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
यातील "फिटनेस की डोस आधा घंटा रोज" मोहिमेद्वारे,नागरिकांनी रोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा संकल्प करण्यासाठी आवाहन केले जात आहे.
हे ही वाचा