ऑनलाईन शिक्षण | SCERT स्वाध्याय शालेय शिक्षण उपक्रम

scert swadhyay


ऑनलाईन शिक्षण | SCERT स्वाध्याय शालेय शिक्षण उपक्रम 

महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता १ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी SCERT SWADHYAY  (Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana) उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गतवर्षी या योजनेचे उद्घाटन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पद्धतीने  ३ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे.

स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत प्रत्येक आठवड्यामध्ये मराठी उर्दू आणि सेमी इंग्रजी माध्यम विषयाचे प्रश्नांचा विद्यार्थ्यांना व्हाट्सअप द्वारे सराव करता येतो.

विद्यार्थ्यांना आता शाळेचा यु डायस क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्याअंतर्गत विद्यार्थी नोंदणी करून व्हाट्सअप मध्ये प्रश्नांचा सराव करू शकतो.

प्रश्न सोडवल्यानंतर शेवटी Answer Key की मिळते. Answer Key पाहून जे विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकले असतील. त्यानुसार दीक्षा ॲप वरील कंटेंट व्हिडिओ चे लिंक मिळतात. त्याद्वारे विद्यार्थी दीक्षा ॲप वरील संबंधित प्रश्नांच्या संकल्पनेनुसार अधिकचा सराव करून घेण्यास मदत होते.

>> SCERT स्वाध्याय उपक्रम २०२१ 

>> SCERT स्वाध्याय उपक्रम लिंक

यंदा अजूनही शाळा सुरळीतपणे सुरू होऊ शकलेल्या नाहीत. शाळा स्तरावर सर्व शिक्षक बांधव ते शासनस्तरावरून सर्व यंत्रणा विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावं यासाठी नाना विविध उपक्रम राबवित आहेत.

त्यामध्ये ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अजूनही पूर्वीप्रमाणे शाळेमध्ये घेतले जाणारे शिक्षण कधी मिळेल? या प्रतीक्षेत  विद्यार्थी आहेत. सातत्याने पालक वर्ग देखील मुलांच्या शिक्षणासाठी मुले कधी शाळेत जातील? पुन्हा कधी पूर्वीप्रमाणे शाळा सुरळीत सुरू होतील? याची वाट पाहून आहे.

अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी वेगवेगळे ऑनलाईन प्रोग्राम घेतले जात आहेत. त्यासोबतच ज्यांच्याकडे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षक घरोघरी जाऊन मुलांना अभ्यास देत आहेत. अभ्यास तपासत आहेत. पालक देखील मुलांचा घरी राहून अभ्यास घेत आहेत. यातीलच एक उपक्रम म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आयोजित SCERT स्वाध्याय भाग 2 या चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सुरू झालेला आहे. आणि SCERT SWADHYAY भाग 2 चा हा सहावा आठवडा आजपासून सुरू झालेला आहे.

दिनांक २१ ऑगस्ट २०२१ ते २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत SCERT स्वाध्याय आठवडा चा विद्यार्थी सराव करू शकणार आहे.

SCERT स्वाध्याय हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरू आहे. गेल्या पाचव्या आठवड्यामध्ये SCERT स्वाध्याय मध्ये राज्यभरातून जवळपास तेरा लाख विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला दिसून आलेला आहे.

'शिक्षण मित्र' या शैक्षणिक वेबसाईट वरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post