आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू, शाळा नोंदणी डायरेक्ट लिंक

RTE 25 Admission : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यांना कळविले आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू

RTE 25 admission

मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दि. १३-१२-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या V.C. तील निर्देशानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने शाळा नोंदणी (School Registration) आणि शाळा व्हेरिफिकेशन ची लिंक सुरु करण्यात आली आहे. 

शाळा नोंदणी (RTE School Registration) नंतर अत्यंत महत्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशन असतो. तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा व्हेरिफिकेशन करताना योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेवर निश्चित करण्यात  आली आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ (PPC 2025) MyGov.in नोंदणी लिंक

तसेच शाळा मान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे) तरी सूचनांचे पालन करुन दिलेल्या कालावधीमध्ये शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी दिले आहे.

RTE School Registration

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने दि. १८-१२-२०२४ ते दि. ३१-१२-२०२४ या कालावधीत शाळा नोंदणी (School Registration) आणि शाळा व्हेरिफिकेशन ची लिंक सुरु करण्यात आली आहे. 

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू, शाळा नोंदणी डायरेक्ट लिंक

अधिकृत वेबसाईट : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया

Pariksha Pe Charcha 2025 Registration

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now