महत्वाची बातमी! पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

Physical Test Of Police Sub-inspector Cadre Announced : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही शारिरिक चाचणी २४ मे ते ६ जून २०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

$ads={1}

महत्वाची बातमी! पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

Physical Test Of Police Sub-inspector Cadre Announced

या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील  नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता मैदान, अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शविल्याने शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम २४ मे, ते  ६ जून, २०२४ या कालावधीत  घेण्यात येणार आहे.

सरकारी नोकरीची संधी, 5 हजारहून अधिक जागांसाठी नवीन भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर..

शारीरिक चाचणीचा कार्यक्रम तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने यांची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करावा. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध, MPSC परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, रिक्त पदे सविस्तर तपशील.

मोठी अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'या' परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now