National Health Mission: केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमांसाठी सर्वसाधारण घटकाकरीता सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये राज्य हिस्सा ४० टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे 'दोन' महत्वपूर्ण शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक १० मे २०२४ रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
$ads={1}
राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य हिस्सा 40 टक्के निधी मंजूर
ग्रामीण जनतेस सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरायी आणि विश्वासार्ह, सर्व प्रकारच्या गरजुंना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल, २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे.
सन २०१४-१५ मध्ये केंद्र शासनाने आरोग्य विषयक सर्व केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करुन त्यास "राष्ट्रीय आरोग्य अभियान" (National Health Mission) असे नाव दिले. या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आता राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनांचा समावेश केला आहे.
कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या कामासाठी सुधारीत मानधन
वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये मागील वर्षामधील केंद्र शासनाचा निधी चालू वर्षी खर्च करावयाचा असल्याने नस्ती नियोजन व वित्त विभागास सादर करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नियोजन व वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे.
कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर 'या' नियमित पदावर समायोजन
त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्वसाधारण घटकासाठी सन २०२३-२४ मधील प्रलंबित राज्य हिश्श्याचे अनुदान सन २०२४-२५ च्या तरतुदीतुन राज्य हिस्सा ४० टक्के प्रमाणे रु.१८६७.९१ लक्ष अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गुड न्यूज! रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत नियमित; शासन आदेश जारी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत Kind Grant मंजूर
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमांसाठी सर्वसाधारण घटका अंतर्गत Kind Grant स्वरुपातील प्रलंबित सन २०२३-२४ मध्ये प्राप्त झालेल्या मंजूरी आदेशाच्या अनुषंगाने समरुप राज्य हिस्सा अंतर्गत ४० टक्के प्रमाणे रु.५५४३.८३ लक्ष इतके अनुदान सन २०२४-२५ मधील मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदीतुन वितरीत करण्यात आले आहे.
मोठी संधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात पहा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्वसाधारण घटकासाठी सन २०२३-२४ मधील प्रलंबित Kind Grant चे राज्य हिश्श्याचे अनुदान सन २०२४-२५ च्या तरतुदीतुन राज्य हिस्सा ४० टक्के प्रमाणे रु.५५४३.८३ लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर निधी वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, इतर खर्च, सर्वसाधारण योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (राज्य हिस्सा ४० टक्के) सहाय्यक अनुदाने वेतनेतर इ बाबीसाठी खर्च करण्याबाबत निधी वर्ग करण्यात आला आहे. (शासन निर्णय -1) (शासन निर्णय -2)
‘आरटीई’ जागांची अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद ;प्रवेश प्रक्रिया पूर्वीसारखीच होणार
महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.