Family Pension Gazette : कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, पेन्शनर कर्मचारी मयत झाल्या नंतर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळते.आणि पत्नीही मयत झाली आणि तिला अविवाहित मुलगी असेल तर तिला यापूर्वी वयाच्या 24 व्या वर्षा पर्यंत पेन्शन मिळत होती, परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
$ads={1}
कर्मचाऱ्यांच्या मुलीला मिळणार कुटुंब निवृत्तिवेतन; महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) सुधारणा नियम 2024
मुलीचे वय 24 वर्ष ही अट रद्द करण्यात आली आहे. त्या मुलीला आता तिचे लग्न होईपर्यंत किंवा ती उपजिवेकेस सुरवात करे पर्यंत तिला पेन्शन मिळणार आहे. तसेच तिचे लग्न झालेच नाही किंवा तिला उपजिविकेसाठी दुसरे साधन मिळाले नाही तर तिला संपूर्ण आयुष्य भरासाठी पेन्शन मिळणार आहे तशी अधिसूचना दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आली आहे.
जेव्हा मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या मागे २४ वर्षपिक्षा अधिक वय असलेल्या एकपेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुली असतील तेव्हा, जी मुलगी, त्याच्या जन्मक्रमानुसार या पोट-नियमान्वये कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलीला, प्रथम कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय होईल;
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ न्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ ला सुधारणा करणारे पुढील नियम करण्यात आले आहे.
‘आरटीई’ जागांची अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद ;प्रवेश प्रक्रिया पूर्वीसारखीच होणार
या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) (सुधारणा) नियम, २०२४ असे म्हणावे.
- सर्वात मोठी मुलगी, तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत, कुटुंब निवृत्तिवेतनास हक्कदार असेल आणि सर्वात धाकटी मुलगी, तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजिविकेस सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर, कुटुंब निवृत्तिवेतनास पात्र होईल.
- विधवा मुलीच्या बाबतीत, तिच्या पतीचा मृत्यु किंवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास :
- परंतु, जर घटस्फोटाची कार्यवाही, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल, परंतु, त्यांच्या मृत्युनंतर घटस्फोट झाला असेल तर, घटस्फोटित मुलीला, घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय राहील.
- परंतु आणखी असे की, जर शासकीय कर्मचाऱ्याचा किंवा निवृत्तिवेतनधारकाचा आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर, मुलीच्या घटस्फोटाच्या दिनांकापूर्वी कुटुंबातील इतर कोणत्याही पात्र सदस्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय झाले असेल तर, कुटुंबातील पूर्वोक्त सदस्य कुटुंब निवृत्तिवेतनाकरिता पात्र असल्याचे बंद किंवा मयत होण्यापूर्वी, अशा घटस्फोटित मुलीला कुटुंब निवृत्तिवेतन सुरु केले जाणार नाही. (कुटुंब निवृत्तिवेतन अधिसूचना पहा)
महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.