Arogya Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी गट-अ’ पदांच्या एकूण १७२९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ ची १७२९ रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया सुरु असून, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
$ads={1}
आरोग्य विभागातील पद भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरती प्रक्रियेदरम्यान अर्ज सादर करण्याची मुदत दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. याआधी अर्ज सादर करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती.
सविस्तर जाहिराती बघण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, मुदतवाढीची सूचना संकेतस्थळावरही आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
विद्यार्थ्यांसोबत आता शिक्षकांचीही परिक्षा घेतली जाणार
अखेर! राज्यातील शाळांची वेळ बदलली! आता ‘या’ वेळेत भरणार शाळामहत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.