RBI Assistant 2023 Recruitment: भारतीय रिझर्व्ह बँकेने 450 सहाय्यक (Assistant-2023) पदांची जाहिरात13 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, RBI असिस्टंट 2023 अधिसूचना, परीक्षेची तारीख, परीक्षा पॅटर्न आणि ऑनलाईन अर्ज बाबत अधिक तपशील जाणून घेऊया..
RBI मध्ये सरकारी नोकरीची संधी!
RBI Assistant 2023 Notification PDF: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना PDF जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना 13 सप्टेंबर 2023 ते 4 ऑक्टोबर 2023 या कालावधीत https://www.rbi.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येईल.
RBI बँक मध्ये सहाय्यक पदांसाठी एकूण 450 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत असून, उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. यामध्ये Prelims, Mains and Language Proficiency Test इ टप्पे असणार आहे. यासाठी Prelims Exam परीक्षेत तर्क क्षमता, संख्यात्मक क्षमता आणि इंग्रजी भाषा ( Reasoning Ability, Numerical Ability and English Language) या विषयांचा समावेश असणार आहे.
RBI Assistant तपशील
- बँकेचे नाव - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
- पदाचे नाव - सहाय्यक (Assistant-2023)
- एकूण जागा - 450
- ऑनलाईन अर्ज महत्वाच्या तारखा - 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2023
- निवड प्रक्रिया - Prelims, Mains, Language Proficiency Test
- परीक्षा पद्धत - ऑनलाईन
- आवश्यक शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा समकक्ष पदवी
- वयोमर्यादा - 20 ते 28 वर्ष (सविस्तर पहा)
RBI Assistant Salary Structure 2023
RBI Assistant असिस्टंटसाठी ऑनलाईन अर्ज असा करा
- Step 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या - https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/
- Step 2: त्यांनतर 'Click here for New Registration' यावर क्लिक करा
- Step 3: आवश्यक तपशील भरा
- Step 4: त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Step 5: आता परीक्षा शुल्क भरा
- Step 6: आणि नंतर शेवटी अर्ज सबमिट Submit करा
- Step 7: भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून घ्या.
- Step 8: नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवा.