International Literacy Day : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस - केरळप्रमाणे महाराष्ट्र सुद्धा 100 टक्के साक्षर होण्यासाठी प्रयत्न

International Literacy Day

International Literacy Day :  (८ सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, शिक्षण हे विकासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. देशातील नागरिक जेवढे साक्षर असतील, तेवढा देश प्रगती करू शकेल. समाजात शिक्षणाचा प्रसार होण्याच्या उद्देशाने युनेस्कोने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय ७ नोव्हेंबर १९६५ रोजी घेतला. त्यानुसार पहिला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर १९६६ रोजी साजरा करण्यात आला. 

केंद्र सरकारने देशभरात साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के व्हावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून कौतुकास्पद काम सुरू आहेच. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण आणून जनतेला १०० टक्के साक्षर बनविण्याच्या उद्देशपूर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. राज्य सरकारनेही शिक्षणप्रसार होण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. केरळप्रमाणे महाराष्ट्र सुद्धा १०० टक्के साक्षर असलेले राज्य बनावे, असे आम्हा सर्वांचे प्रयत्न आहेत. अर्थात, यासाठी जनतेचे आणखी सहकार्य मिळावे, ही अपेक्षा. शालेय शिक्षण मंत्री यांनी ट्वीट करून व्यक्त केली आहे.

51 हजार रूपयांचे बक्षीस! उत्कृष्ट परसबागा निर्मितीसाठी शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला महत्व

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now