अभियंता दिनानिमित्त राज्यातील अभियंता, कर्मचाऱ्यांचा गौरव

Engineers Employees News : अभियंता दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव सोहळा १५ सप्टेंबर २०२३ रोजी  षण्मुखानंद सभागृह (माटुंगा, मुंबई) येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या (Mokshagundam Visvesvaraiah) यांना अभिवादन करण्यात आले. तसेच विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.

$ads={1}

अभियंता दिनानिमित्त राज्यातील अभियंता, कर्मचाऱ्यांचा गौरव

engineers employees news

आज भारतातील अभियांत्रिकीचे जनक डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (Dr. Birth anniversary of Mokshagundam Visvesvaraya) यांची जयंती. भारतातील अनेक धरणे, पाटबंधारे आणि जलसिंचन योजना यांचे बांधकाम करणाऱ्या विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ हा दिवस 'अभियंता दिन' (Engineer's Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना अभिवादन केले. तसेच विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.

$ads={2}

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जेव्हा जनहिताच्या दृष्टीने  एखादा प्रकल्प हाती घेण्यात येतो, तेव्हा त्या प्रकल्पाचं बांधकाम करण्याची जबाबदारी मुख्यतः इंजिनीअर (Engineer) वर असते. आणि ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने निभावण्यासाठी आपले इंजिनीअर्स दिवसरात्र एक करत असतात. तहानभूक विसरून राष्ट्रहिताचं मिशन म्हणून जेव्हा हे अभियंते काम करतात, तेव्हाच आपले प्रकल्प पूर्णत्वास जातात. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचं कौतुक करावं तितकं थोडंच असतं. 

या सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मा. श्रीमती मनीषाताई पाटणकर-म्हैसकर यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर प्राधिकरणांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात अभियंता वर्ग उपस्थित होता. 

हे ही वाचा : या आहेत, मुलींसाठी 5 सरकारी योजना, तुम्हीही लाभ घेऊ शकता, जाणून घ्या

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post