Maharashtra Student Innovation Challenge Competition : सध्या राज्यामध्ये सरकारी नोकरीची मेगा भरती राबविण्यात येत आहे, मात्र सर्वांनाच सरकारी नोकरी मिळेलच याची शाश्वती नसते, त्यामुळे युवकांनी उद्योग उभारणीकडे वळावे, यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, त्यातच आता 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे आयोजन
'Maharashtra Student Innovation Challenge' Competition |
महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' Maharashtra Student Innovation Challenge (MSIC) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यंनाकडे असलेल्या नवनवीन कल्पना, संकल्पनांचा शोध घेऊन, त्यांना उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत व संस्थांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आहे.
राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी कार्यरत आहे. या सोसायटी मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात.
नवउद्योजकांना 5 लाख रुपयांचे बीज भांडवल मिळणार
'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालये तसेच ITI मध्ये शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचा गट पात्र असणार आहे. या गटाकडे तसेच विद्यार्थ्यांकडे नावीन्यपूर्ण संकल्पना (Innovative Concepts) असणे आवश्यक आहे.
$ads={1}
पहिल्या टप्प्यात - विविध शैक्षणिक संस्थांची या उपक्रमासाठी नोंदणी करून त्यातून एका संस्थेच्या माध्यमातून उत्तम दोन Innovative Concepts संकल्पनांची निवड केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये - सर्व संस्थांमधून प्राप्त एकूण संकल्पनांमधून सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड केली जाईल, यामधून सर्वोत्कृष्ट 10 विजेते निवडले जाणार आहे. या विजेत्या गटांना प्रत्येकी 1 लाख रुपयाचे बीज भांडवल देण्यात येणार आहे.
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; संपाबाबत राज्य शासनाचा निर्णय -कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 15,144 रुपयांची वाढ - पोस्ट ऑफिस भरती 30,041 रिक्त पदांसाठी - ऑनलाईन अर्ज
तिसऱ्या टप्यात - 36 जिल्ह्यांतून निवडलेल्या एकूण 360 नवउद्योजकांच्या संकल्पनांचे राज्यस्तरावर सादरीकरण केले जाईल. यातून निवडलेल्या सर्वोत्कृष्ट 10 नवउद्योजकांना प्रत्येकी 5 लाख रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे.
महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेसाठी येथे करा नोंदणी
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उमेदवार वैयक्तिक अथवा कमाल जणांच्या समुहामध्ये सहभागी होऊ शकणार असून उमेदवारांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी www.msins.in अथवा https://schemes.msins.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन "महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज"मध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
$ads={2}