ZP Pune Bharti 2023 : [जाहिरात] जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 171 पदांसाठी भरती, पदांचा तपशील, शैक्षणिक अहर्ता मूळ जाहिरात येथे पहा

ZP Pune Bharti 2023 : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत (NHM Recruitment) 171 जागांसाठी जाहिरात निघाली असून, यामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2023 आहे, सविस्तर जाहिरात पाहूया..

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 171 पदांसाठी भरती

ZP Pune Bharti

जिल्हा परिषद पुणे येथे 171 पदांसाठी भरती शासनाने जाहीर केलेली आहे. पुणे जिल्हा परिषद ची जाहिरात 27/5/2023 रोजी जारी करण्यात आली आहे. जर तुम्ही तुमचे Graduation, B.com किंवा Engineering असणार तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

पद  - रिक्त पदे - शैक्षणिक पात्रता

  1. दंत चिकित्सक - 5 - MDS/BDS
  2. जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी (आयडीएसपी) - 1 - Msc Statistics
  3. वित्त व लेखाधिकारी - 1 - मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.com किंवा M.com ची डिग्री
  4. कार्यक्रम समन्वयक पीपीपी समन्वयक - 1 -  MSW किंवा MA in Social Sciences
  5. लसीकरण क्षेत्र सनियंत्रक - 4 - कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी अप्लाय करू शकतो
  6. स्टाफ नर्स/एल. एच. व्ही/पेडियाट्रिक नर्स - 134 - GNM किंवा Bsc नर्सिंग
  7. सांख्यिकी अन्वेषक - 1 - ग्रॅज्युएशन किंवा मॅथेमॅटिक्स, एमएससीआयटी
  8. एएनएम - 22 - ANM
  9. फॅसिलिटी मॅनेजर - 1 - बीई इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, बीएससी आयटी, टेली कम्युनिकेशन
  10. डायलिसिस टेक्निशिअन - 1 - 10+ 2 सोबत सायन्स आणि डिप्लोमा आणि सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स इन डायलिसिस टेक्नॉलॉजी
नोट - सदरची पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी अवश्य नोंद घ्यावी. सविस्तर मूळ जाहिरात येथे पहा.

राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी मोठी भरती
कर्मचारी निवड आयोगातर्फे ४५२२ पदांची मेगा भरती
पोस्ट ऑफिस मध्ये मेगा भरती सुरु येथे पहा

 वयोमर्यादा (Age Limit)

जिल्हा परिषद पुणे येथे जॉब करण्यासाठी वयोमर्यादा राखीव 43 (NHM कर्मचारी 5 वर्षे (शिथिल) आहेत. (शुद्धीपत्रक येथे पहा)

आवश्यक कागदपत्रे

खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात.
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र आणायला पाहिजे.
  • शाळा सोडल्याचा जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शासकीय अनुभव असलेस अनुभव दाखला
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र जोडणे)

परीक्षा फी

मित्रांनो जिल्हा परिषद पुणे भरती प्रक्रियेसाठी प्रत्येक अर्ज करिता राखीव वर्गातील उमेदवारांसाठी 150/- रुपये आणि राखीव उमेदवारांना 100/- रुपये पैसे द्यावे लागतील आणि पैसे भरताना तुम्हाला हे पैसे डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) स्वरूपामध्ये स्वीकारण्यात येईल. 

(Note: मित्रांनो अर्ज करताना तुम्ही सर्व माहिती व्यवस्थितपणे टाकावी. जर तुमच्या डिमांड ड्राफ्ट (DD) च्या नावांमध्ये चूक आढळल्यास किंवा खराब असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. उमेदवारांनी जाणीवपूर्वक याची नोंद ठेवावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद पुणे या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2023 आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post