kendra pramukh bharti syllabus 2023 : केंद्रप्रमुख पदांच्या 2385 जागांसाठी भरती, परीक्षेचे स्वरूप, सविस्तर अभ्यासक्रम जाहीर पहा..

kendra pramukh bharti syllabus 2023 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे.

त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. १५ जून २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 

kendra pramukh bharti syllabus 2023

केंद्रप्रमुख पदांच्या 2384 जागांसाठी भरती

राज्यामध्ये केंद्रप्रमुख पदासाठी 2384 जागांची मेगा भरतीची जाहिरात निघाली असून, पात्र उमेदवारांकडून दिनांक 6 जून 2023 ते दिनांक 15 जून 2023 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आले आहे. तर जून 2023 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. [सविस्तर येथे पहा]

केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप -  kendra pramukh bharti syllabus 2023

  1. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. 
  2. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. 
  3. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी 2 तासाचा कालावधी राहील.
  4. परीक्षेचे टप्पे - एक लेखी परीक्षा
  5. परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
  6. प्रश्नपत्रिका - एक
  7.  एकूण गुण - 200

केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम

kendra pramukh bharti syllabus 2023

बुध्दिमत्ता व अभियोग्यता

अभियोग्यता - तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता- आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. 

अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुप

उपघटक : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय

  • भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह) ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी.
  • बाल हक्क संरक्षण कायदा, 2005 बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता,
  • विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती
  • विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी विविध योजना

उपघटक 2 : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/ संघटन व त्यांचे कार्य

UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRI, TISS, TIFR. Homi Bhabha Center of Science Education, RTE, EELU, MPSP. SCERT MIEPAL STSE, DIET राज्य आंग्लभाषा इ.

उपघटक 3 : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

  • इंटरनेटचा प्रभावी वापर
  • शाळास्तरावर विविध माहिती भरणे
  • शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीच जान (SARAL UDISE+) संगणक वापराविषयीचे ज्ञान 
  • माहितीचे विश्लेषण
  • शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब

उपघटक 4 : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

  • पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम
  • अध्ययन निष्पत्तीतील उणीवा
  • सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA
  • प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र
  • निकालासंबंधीची कामे

उपघटक 5 : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन

  • प्राप्त माहितीचे विश्लेषण 
  • शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे
  • ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.
  • संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने

उपघटक 6 : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

  • मराठी, गणित, विज्ञान इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान
  • चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी
  • क्रीडा विषयक घडामोडी
Post a Comment (0)
Previous Post Next Post