ITI Admission 2023 : विद्यार्थ्यांनो तयार राहा ! आयटीआय प्रवेश प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू होणार

ITI Admission 2023 : राज्यातील दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून आता विद्यार्थ्यांना पुढील करियर करण्यासाठी नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे, ITI Admission 2023 संदर्भात एक महत्वाची अपडेट अशी आहे की, ज्या विद्यार्थ्यांना आयटीआय साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांना आता दिनांक 12 जून 2023 पासून प्रवेश घेता येणार आहे.

आयटीआयसाठी यंदा 12 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

ITI Admission 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सोमवार १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि.अं.दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आदी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोज आयोजित करण्यात येणार आहेत.

माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ http://www.dvet.gov.inhttps://admission.dvet.gov.in यासह प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सर्व शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MHT-CET परीक्षेचा चा निकाल 'या' तारखेला येथे चेक करा
पोस्ट ऑफिस मध्ये मोठी भरती जाहिरात येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post