Indian Army Recruitment 2023 : आर्मी भरती मेळाव्याचे आयोजन, वेळापत्रक पहा..

Indian Army Recruitment 2023 : इंडीयन आर्मी रिक्रुंटमेंट ऑफिस भरती 2023 अंतर्गत नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई आणि इतर ठिकाणी अग्निवीर पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, त्यानुसार औरंगााबाद अंतर्गत 17 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 दरम्यान Phase I – Online Computer Based Written Examination (Online CEE) परीक्षा पार पडली आता Phase II – Recruitment Rally दिनांक जून 2023 रोजी छावणी मैदान येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्मी भरती मेळाव्याचे आयोजन

Indian Army Recruitment 2023

सैन्य भरतीसाठी 17 ते 26 एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या Online CEE परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांसाठी आर्मी रिक्रुंटमेंट ऑफिस, छावणी मैदान येथे 25 जून रोजी आर्मी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देश दिले.

[वन विभागामध्ये 2138 जागांसाठी मेगा भरती जाहिरात]

यावेळी सेना भरती संचालक कर्नल प्रविणकुमार एस., जिल्हा सैनिक अधिकारी मेजर (निवृत्त) श्रीमती सय्यदा फिरासत, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ही रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात. भरतीच्या ठिकाणी आरोग्य पथक, Quick Response Team तैनात करण्यात यावे. ह्या भरतीसाठी लागणारे मनुष्यबळ तसेच इतर संसाधने उपलब्ध करुन देण्याचे देखील निर्देश श्री पाण्डेय यांनी दिले.

प्रक्रियेबाबत

ही भरती प्रक्रीया औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी येथील विद्यार्थ्यांसाठी आहे. ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी www.Joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरुन प्रवेशपत्रे डाऊनलोड करावेत. वैध प्रवेशपत्र, शपथपत्र आणि आवश्यक कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच रॅलीच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. भरतीप्रक्रीये दरम्यान राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बस सोडलेल्या आहेत.

भरतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

Indian Army Recruitment 2023
Post a Comment (0)
Previous Post Next Post