Forest Department Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आता वन विभागाने सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार वन विभागांमध्ये 2 हजार 288 जागांसाठी भरती होणार असून, त्यामध्ये सर्वेक्षक (गट क) पदांसाठी ८६ जागा भरण्यात येणार आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 पर्यंत आहे.
वनविभागाच्या सर्वेक्षक पदांसाठी ८६ जागांसाठी जाहिरात
पदाचे नाव
- सर्वेक्षक (गट क) - ८६ जागा
- वेतनश्रेणी - S-८: रु.२५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी.
- मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
- अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
ऑनलाईन परीक्षा
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, १२० गुणांची (एकूण ६० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील
- मराठी - ३०
- इंग्रजी - ३०
- सामान्य ज्ञान - ३०
- बौधिक चाचणी - ३०
- ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
- परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
- परीक्षा ही २ तासाची राहील.
उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार सर्वेक्षक पदाकरीता पुढील टप्प्याकरिता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
ऑनलाईन अर्ज कोठे व कसा?
इच्छुक व पात्र उमेदवारांना https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक १० जून ते दिनांक ३० जून २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज कारावा.
https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे. सदर जाहिरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे. {जाहिरात येथे पहा}