SSC CHSL Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोगातर्फे ४५२२ पदांची मेगा भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया...

SSC CHSL Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत मोठी भरती निघाली आहे, या भरतीमध्ये 4 हजार 522 जागा भरण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, या भरती मध्ये डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर इत्यादी पदे भरण्यात येत आहे, सविस्तर जाहिरात पाहूया..

कर्मचारी निवड आयोगातर्फे ४५२२ पदांची मेगा भरती

SSC CHSL Recruitment

नोकरीच्या शोधात सगळेच लोक असतात, त्यात सरकारी नोकरीच स्वप्न असलेल्या  उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोगाने संयुक्त उच्च माध्यमिक स्तरा वरील पदांसाठी एकूण ४ हजार ५२२ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार ssc.nic.in या वेबसाइट वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ जुन २०२३ आहे. तर शुल्क भरण्याची शेवटची तारीख १० जून २०२३ आहे. 

आवश्यक शैक्षणिक पात्रता

डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) -  १२ वी इयत्तेत विज्ञान शाखेतून गणित विषयासह मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष परीक्षा पास असणे आवश्यक आहे.

डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट या पदांसाठी - मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा

SSC CHSL Recruitment 2023

  • ऑनलाईन अर्ज - ९ मे २०२३ ते ८ जून २०२३
  • ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख - १० मे २०२३
  • अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो आणि दुरुस्ती शुल्क ऑनलाइन भरण्याची तारीख - १४ जून २०२३ ते १५ जून २०२३
  • Tier-I (संगणक आधारित परीक्षा) चे वेळापत्रक ऑगस्ट, २०२३ मध्ये जाहीर होणार तर
  • Tier–II (संगणक आधारित परीक्षा) चे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post