हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हा राज्य सरकारने निर्माण केलेला देशातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग आहे. समृद्धी महामार्ग हा नागपूर मुंबई या दोन शहरांना जोडणारा महामार्ग महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधुन जातो. राज्याच्या अर्थकारणास, कृषी विकासास व दळणवळण क्षेत्रास समृद्ध करणारा असा हा महामार्ग आहे. सदर महामार्गाच्या पहिल्या टप्याच्या (नागपुर ते शिर्डी - ५२० किमी) या महामार्गाचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपुर येथे हा सोहळा पार पडला. राज्यस्तरीय मुख्यमंत्री समृध्दी चषक ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन गटानुसार गटातील २ विजेत्यांना प्रत्येकी रुपये ७५००० व ४ उपविजेत्यांना प्रत्येकी रु. ५१००० इतके पारितोषिक रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री समृध्दी महामार्ग चषक ही निबंध स्पर्धा कोणासाठी आहे? आणि निबंध लेखनाचे विषय वाचा सविस्तर
{tocify} $title={Table of Contents}
समृद्धी महामार्गावर निबंध लेखन करून जिंका ७५ हजार रुपयांचे बक्षीस
![]() |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग |
नागपुर ते मुंबई या दोन शहरांना जोडण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
मुख्यमंत्री समृध्दी चषक ही निबंध स्पर्धा लेखन स्पर्धेचा मुख्य उद्देश
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या. यांनी समृध्दी महामार्गाची व्याप्ती आणि निर्माण कार्य महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहचावण्यासाठी या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्ग निबंध लेखन स्पर्धा कोणासाठी?
मुख्यमंत्री समृध्दी चषक ही निबंध स्पर्धा लेखन शाळेतील मुलांसाठी असून दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेमधील विद्यार्थ्यासाठी ही स्पर्धा बंधनकारक करण्यात आली आहे.
- गट १ - इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी
- गट २ - इयत्ता ११ वी ते १२ वी चे शिक्षण घेणारे विद्यार्थी
यांच्यासाठी ही स्पर्धा समृध्दी महामार्ग ज्या जिल्ह्यामधून जातो अशा नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यासाठी खालील विषयाच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्ग निबंध लेखन स्पर्धेचे विषय
गट क्र. १
८ वी ते १० वी
निबंध स्पर्धेचा विषय - माझ्या स्वप्नातील समृध्द महाराष्ट्र
गट क्र. २
इयत्ता ११ वी ते १२ वी
निबंध स्पर्धेचा विषय - रस्त्याचा विकास आणि प्रगती
समृद्धी महामार्ग निबंध लेखन स्पर्धा पारितोषिके
दोन गटांमधून सर्वोत्कृष्ट निबंध असणारा प्रत्येकी एक विजेता आणि दोन उपविजेते निवडण्यात येतील, असे राज्यस्तरावर निवडलेल्या एकुण २ विजेते आणि ४ उपविजेते यांना मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृध्दी चषक, प्रमाणपत्र व पारितोषिक रक्कमेचा धनादेश देण्यात येईल.
संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याहस्ते सन्मानित
- तसेच प्रत्येक जिल्हास्तरीय १६ विजेते य ३२ उपविजेते यांना त्यांच्या उत्कृष्ट लेखनावरील संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
- राज्यस्तरावरील दोन्ही गटातील २ विजेत्यांना प्रत्येकी रुपये ७५००० व ४ उपविजेत्यांना प्रत्येकी रु. ५१००० इतके पारितोषिक रक्कम देण्यात येईल.
समृद्धी महामार्ग निबंध लेखन स्पर्धा कालावधी
समृद्धी महामार्गाची वैशिष्ठ्ये - निबंध लेखनासाठी महत्वाचे मुद्दे
- एकूण १२० मीटर रुंदीचा ६ पदरी द्रुतगती मार्ग
- १० जिल्हे, २६ तालुके आणि आसपासच्या ३९२ गावांना जोडणारा महामार्ग
- या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त ८ तासात कापणे शक्य.
- या महामार्गावर प्रस्तावित वाहन वेग(डिझाईन स्पीड) असेल ताशी १५० किमी
- महामार्गालगत होणार १९ कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती
- भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे ११ लाख ३१ हजार वृक्षांची होणार लागवड
- महामार्गाच्या प्रत्येकी ५ किमी अंतरावर असणार सीसी टीव्ही कॅमेरे आणि विनामूल्य दूरध्वनी सेवा
- समृद्धी महामार्गात अत्याधुनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करुन विविध संरचनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ६५ उड्डाणपूल, ३३ मोठे पूल, २७४ छोटे पूल, ८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, २५ इंटरचेंजेस, ६ बोगदे, १८९ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ११० भुयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी २०९ भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी ३ भुयारी मार्ग आणि ३ उन्नत मार्गाचा समावेश असेल.
- समृद्धी महामार्गावर बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभिकऱण, सुधारीत पथदिवे, आणि डिजीटल संकेत (सिग्नल) यांचा वापर करण्यात येणार आहे.
- समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा महामार्ग आहे.
- या महामार्गामुळे अभयारण्ये, ऐतिहासिक पर्यटनस्थळ, व्याघ्र प्रकल्प सफारी, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटनस्थळी जाणे पर्यटकांना सहज शक्य होणार आहे.
- समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी २४ ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते (इंटरचेंज) यामुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
- लोणारचे सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबीका मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक येणार आहेत.
- समृद्धी महामार्गावर ठराविक ठिकाणी वीजेवर चालणार्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स, तसेच १३८.४७ मेगावॅट उर्जा निर्मिती करणारे सौर उर्जा प्रकल्प असतील.
- उत्तम डिजिटल सेवा आणि अन्य महत्त्वाच्या सेवा पुरवण्यासाठी द्रुतगती मार्गासह ऑप्टिकल फायबर केबल्स (ओएफसी केबल्स), गॅस पाइपलाइन, वीजवाहक तारा आणि सुविधा केंद्रे इत्यादीचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नकाशा
![]() |
samruddhi mahamarg route map |
समृद्धी महामार्ग संबंधित सामान्य ज्ञान आधारित वारंवार विचारले जाणारे प्रश्न
>> सकारात्मक विचार कसा करावा? | आनंदी जीवन जगण्याचे 7 सूत्र
>> सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य
>> सावित्रीबाई फुले निबंध मराठी
अशाच नवनवीन अपडेट साठी आजच 'शिक्षण मित्र' WhatsApp जॉईन करा.