विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात ही शाळेपासून होत असते. प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असताना योग्य वयामध्ये योग्य संस्कार त्यांच्यमध्ये रुजवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर शाळेची दैनंदिन दिवसाची सुरुवात ही शालेय परिपाठाने होत असते. शालेय परिपाठ हा दर्जेदार आणि योग्य पद्धतीने घेतला तर चांगल्या सवयी मुलामध्ये रुजतील, परिपाठामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देता येईल त्यामध्ये शालेय परिपाठ सूत्रसंचालन पासून ते शालेय परीपाठातील सर्व कृती मुले स्वत:च पूर्ण करून घेतील यासाठी मुलांना संपूर्ण आदर्श शालेय परिपाठ (Paripath) आणि सूत्रसंचालन कसे करता येईल याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत.
आदर्श - शालेय परिपाठ सूत्रसंचालन मराठी
उद्याचा चांगला नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना लहानपणापासून चांगल्या सवयी रुजवणे आवश्यक आहे. असे म्हटले जाते की, आजची शिक्षण पद्धती ही उद्याच्या आपल्या देशाची प्रगती त्यावर अवलंबून असते. यासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण त्यांना योग्य पद्धतीने देणे आवश्यक असते. यासाठी लहान वयात प्राथमिक स्तरावर आदर्श शालेय परिपाठ नियोजन करताना इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय मुले व मुली यांचे समान गट करावे आणि त्यांना परिपाठ घेण्यास दर दिवशी वेगळा गट याप्रमाणे नियोजन करून मुलांना तयार करावे. व शालेय परिपाठ घ्यावा.
आदर्श शालेय परिपाठ सूत्रसंचालन
- राष्ट्रगीत
- प्रतिज्ञा
- संविधान उद्देशिका
- प्रार्थना
- आजचे पंचांग
- दिन विशेष
- आजचा सुविचार
- आजची म्हण
- बातम्या
- सामान्य ज्ञान (प्रश्न मंजुषा)
- विज्ञान कोडे (वैज्ञानिक दृष्टिकोण)
- बोधकथा
- आजचे इंग्रजी शब्दार्थ
- दिनांक तो पाढा
- समूह गीत
- पसायदान
- आना-पान
- मौन
- विसर्जन
हे ही वाचा