'परीक्षा पे चर्चा' शिक्षक-विद्यार्थी व पालकांसाठी निबंध लेखन विषय

परीक्षा पे चर्चा 6 (#PPC2023) या कार्यक्रमांतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी चे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे समवेत तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथे जानेवारी 2023 मध्ये संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये 2050 विजेत्यांना मा. संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच मा. पंतप्रधान महोदय यांनी लिहिलेले "परीक्षा योद्धा" हे पुस्तक देण्यात येणार आहे.

{tocify} $title={Table of Contents}

परीक्षा पे चर्चा 2023

'परीक्षा पे चर्चा' शिक्षक-विद्यार्थी व पालकांसाठी निबंध लेखन विषय

परीक्षा पे चर्चा - ६ या कार्यक्रमात आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक यांची सहभागी म्हणून नोंदणी करणेसाठी दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२२ कालावधी देण्यात आला होता. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 27 जानेवारी 2023 पर्यंत #ppc2023 नोंदणी करता येईल.

 http://innovateindia.mygov.in/ppc-2023/  विविध विषयांवर ऑनलाईन सृजनात्मक निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षा पे चर्चा निबंध विषय -विद्यार्थ्यासाठी

परीक्षा पे चर्चा 2023 या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी विविध निबंध लेखन विषय देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे

परीक्षा पे चर्चा - ६ या कार्यक्रमात सहभागी होणेसाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसाठी पुढील विषय देण्यात आलेले आहे.

परीक्षा पे चर्चा निबंध विषय (विद्यार्थ्यासाठी) 
निबंध लेखन आपण कोणत्याही भाषेत करू शकता. त्यासाठी मराठी/इंग्रजी व हिंदी मध्ये खालील विषय देण्यात आले आहे.

1.आमचे स्वातंत्र्यसैनिक

(Know your freedom fighters) 
(हमारी आजादी के नायक)
तुमच्या राज्यातील किंवा प्रदेशातील स्वातंत्र्य सैनिकांबद्दल तुम्ही कोणत्या जीवनकथा ऐकल्या आहेत. त्यांच्या जीवनकथेतून तुम्हाला काय प्रेरणा मिळते ? तुम्हाला देशसेवा कशी करावयाची आहे याबद्दल आपले मत लिहा.

2. आमची संस्कृती आमचा अभिमान 

(Our culture is our pride) 
(हमारी संस्कृती हमारा गर्व)
तुमच्या राज्याच्या संस्कृतीचे वैशिष्टे काय आहे ? संस्कृतीतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला तुमच्या देशाचा अभिमान वाटतो? 

3. माझे प्रेरणादायी पुस्तक

(My book my inspiration) 
(मेरी प्रिय किताब) 
तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यामध्ये कोणत्या पुस्तकाचे योगदान आहे व कसे ? त्याबद्दल लेखन करावे.

4. पुढील पिढीसाठी पर्यावरण संरक्षण

(Save Environment for future generations)
(आने वाली पिढीयों के लिये पर्यावरण सुरक्षा) 
शाश्वत विकासाबद्दल तुमच्या काय कल्पना (विचार) आहेत. हवामानातील बदलामुळे आपल्या भावी पिढीसाठी कोणती आव्हाने आहेत ? आपल्या पर्यावरणाचे रक्षण (संवर्धन) करण्यासाठी आपण/कोणते उपाय केले पाहिजेत विद्यार्थी म्हणून शाश्वत विकासासाठी तुम्ही कसे योगदान देऊ शकता ? 

5. माझे जीवन माझे आरोग्य 

(My life, my health)
(अच्छा स्वस्थ क्यो जरुरी है ? )
निरोगी राहणे का जरुरीचे आहे ? निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता ? 

6. माझे नाविन्यपूर्ण व्यावसायिक बनण्याचे स्वप्न

(My startup dream)
(मेरा स्टार्टअप का सपना )
विद्यार्थ्यांमध्ये जीवनात यशस्वी व स्वावलंबी होण्यासाठी उद्योजकता निर्माण करणे आणि त्याचवेळी देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि कार्यसंस्कृतीत योगदान देणे ही काळाची गरज आहे. तुमच्या स्टार्टअपबद्दल तुमची स्वप्ने काय आहेत ?

7. चौकटीबाहेरचे शिक्षण

(STEM education / education without boundaries)
(सीमाओं के बिना शिक्षा)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार विद्यार्थ्यांना विषया निवडीबाबत लवचिकता देणेबाबत शिफारस केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय घेण्याचे स्वतःचा मार्ग निवडण्याचे आणि स्वतःच्या आवडीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असेल, विज्ञान आणि गणिताच्या पलीकडेहि जीवन आहे याबद्दल तुम्ही काय विचार करता ? या बदलासंदर्भातील शिफारशीमध्ये तुम्हाला कोणती आव्हाने दिसतात? याबाबत तुमच्या सूचना काय आहेत ?

8.शाळेत शिकण्यासाठी खेळणी आणि खेळ

(Toys and games for Learning in Schools)
(विद्यालय में सिखने के लिये खिलौने और खेल) 

खेळणी आणि खेळ हे सुद्धा शिकण्याचे स्रोत असू शकतात. माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांनी खेळणी आणि खेळांद्वारे शिकण्यासंदर्भात तुमचे मत लिहा.

परीक्षा पे चर्चा - शिक्षकांसाठी निबंध लेखन विषय

1. आमचा वारसा

(Our Heritage) 
(हमारी धरोहर) 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय पारंपरिक ज्ञान शिकवण्याचे महत्व काय आहे ? यासाठी तुम्ही शालेय परिसरामध्ये शैक्षणिक उपक्रमांचे एकत्रीकरण कसे कराल ?

2. अध्ययनपूरक वातावरण

(Enabling Learning Environment)
(सीखने के लिये समर्थ वातावरण)
समृद्ध शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी निरोगी आणि अनुकूल वर्ग वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असावी ? सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही क्रियाकलपांची रचना कशी कराल? "सहध्यायी अध्ययना" बद्दल तुमचे विचार आणि मत काय आहे ?

3. कौशल्याधारित शिक्षण

(Education for Skilling) (कौशल्य के लिये शिक्षण)  कौशल्य आधारित शिक्षण खूप महत्वाचे आहे. आपल्या देशात कौशल्य शिक्षण देण्यासाठी संपूर्ण शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक असले तरी माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे हि काळाची गरज आहे. कारण अनेक विद्यार्थी शैक्षणिक/उच्च शिक्षण घेण्यास प्राधान्य देत नाहीत. उलट त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी विविध मार्ग शोधायचे असतात. यावर तुमचे काय मत (विचार) आहेत ?

4. अभ्यासक्रमाचे कमी ओझे व भयमुक्त परीक्षा

(Lesser Curricular Load and No fear for exam) (पाठ्यक्रम का कम भार और परीक्षा का कोई भय नाही)  
विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण आणि प्रकल्प आधारित अभ्यासक्रमाद्वारे शिकावे. ते काय शिकतात आणि कसे शिकतात यावर विश्वास असावा, यामुळे परीक्षेचा ताणताणाव आपोआप कमी होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० मधील हा दृष्टीकोन अंमलात आणण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही कसा पुढाकार घ्याल.

5. शिक्षणातील भविष्यकालीन आव्हाने

(Future Educational challenges)
(भविष्य में शिक्षा कि चुनौतीयाँ) 
तुमच्या मते सध्याची शैक्षणिक आव्हाने काय आहेत ? शैक्षणिक प्रवाहातील बदलाना तोंड देण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घ्यावी.

परीक्षा पे चर्चा - निबंध लेखन पालकांसाठी विषय

1. माझे मुल, माझे शिक्षक

My child, my teacher
(मेरा बच्चा मेरा अध्यापक)  तुमच्या मुलाने तुम्हाला काय आवडीने शिकविले आहे ? तुम्ही ते कसे शिकलात आणि त्याच्याशी कसे जुळवून घेतले? आपल्या मुलांच्या आवडींशी जुळवून घेणे का महत्त्वाचे का आहे? 

2. प्रौढ शिक्षण सर्वाना साक्षर बनविते

(Adult Education making everyone literate)
(प्रौढ शिक्षा सभी को साक्षर बनायें)
तुमच्या मते प्रौढ शिक्षणाचे महत्व काय आहे ? त्यातून समृद्ध राष्ट्र कसे निर्माण होऊ शकते ? प्रौढांना आधुनिक समस्या समजून घेण्यात मुले कशी योगदान देऊ शकतात ? 

3. सर्व शिका आणि पुढे जा

(Learning and growing together)
(सिखना और एक साथ बढना) 
तुम्ही तुमच्या घरी मुलाला शाळेत शिकण्यासाठी कसे प्रोत्साहित कराल? तुमच्या मुलाच्या समृद्ध शिक्षण प्रक्रियेत पालक म्हणून तुमची भूमिका काय असेल यावर एक सृजनात्मक टीप लिहा.

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी वरील पैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करावे. त्यासाठी खालील वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. व सहभागी व्हावे. (Pariksha Pe Charcha Official Website)
http://innovateindia.mygov.in/ppc-2023/

हे ही वाचा

📌 परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा


अशाच नवनवीन अपडेट साठी आजच 'शिक्षण मित्र' WhatsApp जॉईन करा.

shikshan mitra whatsapp

Post a Comment (0)
Previous Post Next Post