दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay In Marathi

विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाच्या नंतर सगळ्यांना वेध लागते ते दिवाळीचे. भारतामध्ये साजरे होणाऱ्या सणांमधील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी जस-जशी जवळ येऊ लागते. तस-तसे सगळीकडे आनंदाचे , उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व घरांमध्ये आनंदाचे वातावरण असते. घराला नवीन रंग देणे, साफसफाई करणे, घरात असलेला पसारा आवरणे, नवीन कपडे खरेदी करणे, दागिने भेटवस्तू विकत घेणे, रोषणाई करणे, फराळ बनवणे अशा अनेक गोष्टींची तयारी दिवाळी सणाला सर्वजण आवडीने करत असतात. आज आपण माझा आवडता दिवाळी सण या विषयावर मराठी निबंध लेखन करणार आहोत. आपल्याला दिवाळी या सणाचा निबंध लेखन करण्यासाठी याची मदत होणार आहे. या लेखनामध्ये आपण आपले दिवाळी सणाचे अनुभव लेखन करून दिवाळी निबंध लेखन करावे.

diwali nibandh marathi
दिवाळी निबंध मराठी


{tocify} $title={Table of Contents}

 

दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay In Marathi

दिवाळी सणाची माहिती 

दिवाळी सण म्हणजे "दिव्यांचा उत्सव" होय.पावसाळा ऋतू संपून हिवाळा सुरू झालेला असतो,सर्व ठिकाणे हिरव्यागार झाडेझुडपे, गवत आणि उल्हासमय , आल्हाददायक वातावरण असते ,निसर्ग शांत झालेला असतो,पशू पक्षी तृप्त झालेले असतात. कारण पाऊस पडून गेलेला असल्याने, सर्व ठिकाणी चारा पाणी सहज उपलब्ध असते.त्यामुळे दिवाळी जवळ जवळ येताना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आनंदाचे, उल्हासमय वातावरण तयार झालेलं असते.

भारतात तसेच हिंदू धर्मात अतिशय मोठा आणि महत्त्वाचा असा दिवाळी सण समजला जातो.या सणाला बाजारपेठा भरभरून गेलेल्या असतात.तसेच सणाची घरोघरी जोरात तयारी सुरू झालेली असते. सर्व ठिकाणी वातावरण आनंदी आणि उत्साही असते.

दिवाळी सणाचे महत्व

दिवाळी सण हा एक प्राचीन हिंदूंचा उत्सव असून, जो शरद ऋतूमध्ये येतो,  दरवर्षी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी कार्तिक अमावस्या असते. अमावस्या असल्याने सगळीकडे अंधार असून या पाच दिवशी दिवे लावून या अंधारावर विजय मिळवला जातो. अशी आख्यायिका आहे की, याच दिवशी दिव्यांनी अंधारी रात्रीवर विजय मिळवला जातो. 

लक्ष्मीदेवी पर्यटनासाठी बाहेर पडतात आणि आपल्या भक्तांसोबत आनंद सामायिक करतात. तसेच भारतात अशी आख्यायिका आहे की , चौदा वर्षांचा वनवास संपवून जेव्हा श्रीराम सीतेसह आयोध्या मध्ये परत येतात, तेव्हा घरोघरी हजारो दिवे जाळून आयोध्या शहर फुलांनी ,रांगोळीने आणि दिव्यांनी सजवले होते.म्हणून या दिवशी दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळी सणाचे पाच दिवस असतात त्या पाच दिवसाचे पाच वेगवेगळे महत्त्व आहे.

दिवाळी सण पाच दिवसाचे वेगवेगळे महत्त्व

  1. धनत्रयोदशी
  2. नरक चतुर्दशी
  3. लक्ष्मीपूजन (दिवाळी)
  4. पाडवा बलिप्रतिपदा (दीपावली पाडवा)
  5. भाऊबीज

पहिला दिवस - धनत्रयोदशी

या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असेही म्हटले जाते. दिवाळीचा सणाचा पहिला दिवस हा धनत्रयोदशीपासून सुरू होतो. या दिवशी सर्व दिवे पणत्या, आकाशदिवे ,लाईट माळा, लावून सजावट केली जाते.

सर्वजण आपापल्या घराची व परिसराची सजावट करतात. याच दिवशी बाजारात जाऊन मौल्यवान वस्तू म्हणजे सोने चांदी किंवा कामाचा इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात, कारण हा दिवस शुभ मानला जातो अशी प्रथा आहे. 

साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्याने या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी केल्यास  त्याचा लाभ चांगला होतो. म्हणून या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी करण्यासाठी लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करतात. 

शरीर निरोगी ठेवण्याची  देवीला प्रार्थना केली जाते. या दिवशी धन्वंतरी देवीचा वाढदिवस असतो अशी पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. या दिवशी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि वाईट प्रवृत्तीचा नाश करते, म्हणून धनवंतरी ला पाचा दिवसांपैकी विशेष महत्व आहे.

दुसरा दिवस - नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी हा दिवस दीपावलीच्या पाच दिवसांपैकी 2रा दिवस असून या दिवशी सूर्यदेव उगवण्याचे अगोदर स्नान केलं जाते. त्यालाच अभ्यंगस्नान असे म्हटले जाते.याचदिवशी उटणे लावणे किंवा आता जसे जग बदलत चालले तसे जुने नाहीसे होऊन नवीन गोष्टी केल्या जातात त्याचे उदा. म्हणजे या दिवशी वेगवेगळा साबण वापर केला जातो.

जसे दिवाळी जवळ जवळ येत असते तशी तशी मोती साबणाची जाहिरात टीव्ही वर पाहायला मिळते हा झाला गमतीचा विषय परंतु,या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे .हिंदू धर्मात प्रत्येक सणाची आख्यायिका ही वेगवेगळी सांगितली जाते प्रत्येक सणाला पूर्वी काहीतरी वेगवेगळ्या घटना घडून गेलेले असल्याने रूढी परंपरेनुसार हे सण साजरे केले जातात आणि या सणाचा आनंद हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण आहे.

त्यामुळे या सणाच्या निमित्ताने समाजामध्ये सामाजिक बांधिलकी एकमेकांविषयी आदर ,प्रेम ,आपुलकी इत्यादी गोष्टी वाढण्यास मदत होते.याच दिवशी देवांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता,म्हणून पहाटे अभ्यंगस्नान केले जाते . तेव्हापासून या दिवसाला नरकचतुर्दशी म्हटले जाते.

दिवस तिसरा- लक्ष्मीपूजन (दिवाळी)

पाच दिवसा पैकी लक्ष्मी पूजन किंवा दीपावली हा तिसरा दिवस असतो. हा पाच दिवसांपैकी अतिशय महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच भगवान गणेश, सरस्वती ,भगवान कुबेर यांची पूजन केले जाते .तसेच वर्षभर आपल्या घरातील केरसुणी चा वापर अपान केर भरण्यासाठी करतो म्हणून तिला धुवून तिला हळद कुंकू झेंडूची फुले वाहून पूजा केली जाते. 

या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करतात आणि कायम स्वरूपी असेच आमच्या घरी राहावे म्हणून सर्व घरातील लहान थोर व्यक्ती देवीला प्रार्थना करतात. सर्व देवी देवतांची पूजा करून घरामध्ये सर्व ठिकाणे दिवे लावून आकाशकंदील लावून फटाके फोडून, देवी लक्ष्मीची स्वागत करतात. तिला मनोभावे नैवेद्य दाखवून ,नैवेद्य मध्ये वेगवेगळे गोड गोड पदार्थाचे समावेश करुन सर्व देवी देवतांची पूजा केली जाते . 

वेगळ्या प्रकारची फुले घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रंगीबिरंगी लाईट यांची झगमगाट केली जाते. घरातील सर्व द्रव्य, मौल्यवान वस्तू,धन यांची पूजा केली जाते.तसेच पूजेसाठी घरात असणारे सर्व दिवे तेल टाकून उजळले जातात . असे म्हटले जाते की घरातील एकही दिवस विना पेटवता ठेऊ नये.तसेच सर्वांचे डाग दागिने पूजेला मांडले जातात. तसेच घरातील दारे-खिडक्या सर्व उघडे ठेवून संध्याकाळी मनोभावे लक्ष्मीदेवीची पूजा घरातील सर्व मंडळी करतात.म्हणून या दिवसाला लक्ष्मीपूजन किंवा कुबेरपुजन असे म्हटले जाते.

दिवस चौथा - पाडवा /बलिप्रतिपदा

हा दिवस वर्षप्रतिपदा म्हणून ओळखला जातो.या दिवशी राजा विक्रम सिंहसणावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने  झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातील जनतेचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.या दिवसाला गोवर्धन पूजन म्हटले जाते. या दिवशी पती-पत्नी एकमेकांना छान उपहार देऊन एकमेकांना खुश करतात. तसेच याच दिवशी गोवर्धन पूजा सुद्धा केली जाते. म्हणून या दिवसाला प्रतिपदा किंवा पाडवा असे म्हटले जाते.

दिवस पाचवा - भाऊबीज

पाचवा दिवस हा भाऊबीजेचा सण असतो.याच दिवशी बहीण भावाला ओवाळून बहिण-भावाचा हा प्रेम आपुलकी आदर निर्माण करण्याचा  दिवस ओळखला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळून आपल्या भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी देवाकडे विनंती करते, 

तसेच भाऊ आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू देऊन तिचा आदर मानसन्मान ठेवून तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. तसेच हा सण रक्षाबंधन सणाप्रमाणे साजरा केला जातो. भाऊ-बहिणीच्या नात्याचा जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा आदर निर्माण करणारा हा दिवस आहे म्हणून या दिवसाला भाऊबीज असे म्हटले जाते. हा दिवस दिवाळीच्या पाच सणांची पैकी शेवटचा दिवस असून या दिवसाला सुद्धा खूप महत्त्व आहे.

अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये हा दिवाळी / दीपावलीचा सण साजरा केला जातो. हा सण संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे .अगदी भारतीय लोक इतर देशात कामानिमित्त जरी राहत असली तरी हा सण त्याठिकाणी ते अति उत्साहाने साजरे केले जातात.

हे ही वाचा

Post a Comment

Previous Post Next Post