शिक्षकांसाठी गुड न्यूज ! 'टीईटी' संदर्भात औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 च्या गैरप्रकारात (टीईटी परीक्षा घोटाळा) अडकलेल्या व सरकारी तसेच खासगी शाळेत कार्यरत शिक्षकांचे वेतन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. शिक्षण संचालक यांनी एका आदेशाद्वारे शालार्थ क्रमांक प्राप्त शिक्षकांचे शालार्थ क्रमांक गोठविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात 2019 च्या शिक्षक पात्रता परीक्षेत 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र केले आहे.

यासंदर्भात 7 हजार 880 शिक्षकांचे वेतन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. तथापि या निर्णयाच्या विरोधात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये धाव घेतली. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दिलासादायक निर्णय दिला आहे.

tet-ghotala-aurangabad-bench-decision


टीईटी संदर्भात औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी याचिकाकर्त्या शिक्षकांना वेतनवाढ देऊ नका, मात्र त्यांचे वेतन थांबवू नका, चालू महिन्यापासूनच त्यांचे वेतन सुरू करून पुढील आदेशापर्यंत कारवाई करू नये, असा दिलासादायक निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात एक हजारपेक्षा अधिक शिक्षकांच्या दीडशेवर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी एकत्रित सुनावणी कोर्टात झाली. त्याचबरोबर नागपूर व मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल आहे.

काय आहे टीईटी गैरप्रकरण ?

पुणे सायबर सेल पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या संदर्भात झालेला टीईटी परीक्षा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाला पुणे सायबर पोलिसांनी दिला आहे.

2019-20 च्या टीईटी परीक्षेमध्ये एकूण 16,592 परीक्षार्थ्यांना टीईटी परीक्षेत पात्र केल्याचे दिसून आले. निकाल पडताळून पाहिल्यानंतर (TET ghotala list) त्यातील 7 हजार 880 परीक्षार्थी अपात्र असतानाही त्यांना टीईटी च्या निकालामध्ये पात्र ठरवण्यात आल्याचे तपासांती निष्पन्न झाले होते.

त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच 'टीईटी परीक्षा' 2019-20 मध्ये पैसे देऊन पात्र ठरलेल्या 7 हजार 880 उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पोलीस व शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती.

उमेदवारांच्या OMR शीटमध्ये फेरफार गुण वाढवून घेणे आणि थेट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले होते. पात्र नसताना पैसे घेऊन पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळविलेल्या उमेदवारांची माहिती पुणे सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाला दिली होती.

हे सुद्धा वाचा


प्रत्येक नविन अपडेट - 'शिक्षण मित्र' वेबसाईट - सोशल मिडिया जॉईन करा.Post a Comment

Previous Post Next Post