सर्वेक्षणातून समोर आली विद्यार्थ्यांची मानसिकता 49% मुले वैयक्तिक आयुष्यावर नाखूश

भारत सरकारने इयत्ता 6 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर एक सर्वेक्षण (विद्यार्थ्यांची मानसिक स्तिथीबाबत सर्वेक्षण) हाती घेतले होते. या सर्वेक्षणा दरम्यान 49% मुले ही आपल्या वैयक्तिक आयुष्यावर नाखुश (दु:खी) असल्याचे समोर आले आहे.

Survey Students Mental Health


भारत देश हा सध्या तरुण युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. आपल्या भारत देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. भारतामधील तरुणांची मुख्य समस्या म्हणजे रोजगार हे आहे.

भारत सरकारने इयत्ता 6 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर एक सर्वेक्षण (विद्यार्थ्यांची मानसिक स्तिथीबाबत सर्वेक्षण) हाती घेतले होते. या सर्वेक्षणा दरम्यान 49% मुले ही आपल्या वैयक्तिक आयुष्यावर नाखुश (दु:खी) असल्याचे समोर आले आहे.

भारत देश हा सध्या तरुण युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. आपल्या भारत देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. भारतामधील तरुणांची मुख्य समस्या म्हणजे रोजगार आहे. त्यामुळे पुष्कळ तरुण बेरोजगार आहेत. या प्रमुख समस्यामुळे आपल्याला तरुण वर्गात नाराजी पाहायला मिळते. ताण-तणाव , वैयक्तिक आयुष्य यामध्ये तरुण दुःखी असल्याचे आपण ऐकले आहे.

मात्र आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, शालेय वयोगटातील मुले देखील आपल्या वैयक्तिक आयुष्यात खुश नाही. 

सर्वेक्षण कोणामर्फत व कोठे करण्यात आले?


कोरोना नंतर मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे सर्वेक्षण केले. 

विद्यार्थ्यांच्या मानसिक सद्यस्थितीबाबत (Students Mental Health) हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये इयत्ता 6 वी ते 12 वीत शिकणाऱ्या मुलांचा समावेश होता.

या सर्वेक्षणात 3 लाख 78 हजार विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 88 हजार मुली तर 1 लाख 90 हजार मुलं होती आणि 11 जण थर्ड जेंडरचे विद्यार्थी होते.

सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे


  • यामध्ये सुमारे 49% मुलं त्यांच्या खासगी आयुष्यात तसेच बॉडी इमेज यांच्याबद्दल खुश नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर सुमारे 51% विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातील विषय आणि पाठ्यपुस्तकातील साहित्य समजणे अवघड जात असल्याची माहिती या सर्वेक्षणातून (Survey) मिळाली आहे. 
  • मात्र यामधील एक चांगली गोष्ट अशी की, 73% विद्यार्थी हे त्यांच्या शाळेबद्दल आणि शाळेतील शिक्षणाबद्दल समाधानी आहेत. तर 33% विद्यार्थ्यांना शाळा व शाळेतील शिक्षण यासंदर्भात शालेय वातावरणाचे दडपण असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • मुलांच्या एकाग्रतेच्या सर्वेक्षणात 29%  विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव असल्याचे दिसून आले, तर कोरोना च्या काळात आणि नंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये 51% विद्यार्थ्यांना ऑनलाइन विषय आणि पाठ्यपुस्तकातील ई-साहित्य समजणे अवघड जात आहे. 
  • तसेच 28% मुले शिक्षकांना प्रश्न विचारण्यास घाबरतात. तर 14% मुले जास्त भावनिक (Emotional) आहेत.

मुलांची मानसिक स्थिती जर चांगली असेल तर, शाळेतील शिक्षण मुले अधिक चांगल्या पद्धतीने ग्रहण करू शकतील, मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी मुलांच्या पालन-पोषण, आहार, मुलांच्या आवडी, क्षमता , गरजा, कुटुंबातील वातावरण, शालेय वातावरण इ. सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

Post a Comment (0)
Previous Post Next Post