अभ्यासाचे नियोजन ! 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2023

ठळक मुद्दे

  • - बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून
  • - दहावीची परीक्षा २ मार्चपासून
  • - बारावीच्या परीक्षेला १५५ दिवस शिल्लक
  • - दहावीच्या परीक्षेला १६४ दिवस शिल्लक

अभ्यासाचे नियोजन ! 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2023

sss-hsc-exam-mahahsscboard-time-table-2023


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune) यांच्या तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

कोरोना महामारीनंतर आता २०२३ मध्ये १००% अभ्यासक्रमावर आधारित १० वी व १२ विची परीक्षा होणार आहे. त्यानुसार १२ वी (12th board exam 2023 date) ची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा (10th board exam 2023 date) २ मार्चला सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाने परिपत्रक काढून दिली आहे.

2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक www. mahahsscboard.in  या अधिकृत मंडळाच्या mahahsscboard वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

>> तंत्र अभ्यासाचे , रहस्य यशाचे लेखमाला 

>> 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक डाउनलोड करा.

>> इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा Questionbank प्रश्नपेढी

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. हे संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. 

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे व राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. 

अभ्यासाचे नियोजन | 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा

नियोजन ही अशी गोष्ट आहे की, कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य करण्यासाठी जर योग्य पद्धतीने नियोजन केले तर अर्धी लढाई आपण येथे जिंकतो. म्हणून नियोजन हे व्यवस्थित असायला हवे, दहावी बारावीच्या परीक्षेसाठी साधारणपणे १५० दिवसाचा कालावधी आपल्याकडे उपलब्ध आहे. या दिवसांमध्ये आपण आपल्या विषयांचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने करू शकतो याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

अभ्यासाचे नियोजन करत असताना शाळा/कॉलेज व क्लास मध्ये जाणारा वेळ आणि या व्यतिरिक्त मिळणारा वेळ त्यातही स्वत:च्या दैनदिन क्रिया , छंद जोपसण्यासाठीचा वेळ या सर्व गोष्टीचे नियोजन आपल्या आभ्यासाच्या नियोजनात असायला हवे. 

अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा त्यामध्ये वाचन-लेखन-पाठांतर-मनन-चिंतन , प्रश्नपत्रिका सोडविणे किंवा शाळा/कॉलेज व क्लास मधील होमवर्क , इतर वर्क करण्यासाठी योग्य वेळ ठरवून घ्यावा. 

१० वी व १२ वी परीक्षा ही बोर्डाची परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या करियर चा टर्निंग पॉईंट त्यामुळे आपल्याला अवघड व सोप्या वाटणाऱ्या विषयानुसार सर्व विषयांना समान वेळ देऊन आपण अभ्यासाचे नियोजन करा.

>> करिअर कसे निवडायचे ? | स्व ची ओळख Self Awarness | How to choose a career ?

>> करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, शिष्यवृत्या, महाविद्यालय ,प्रवेश परीक्षा याविषयी माहिती.

नियोजन करताना प्राधान्य क्रम ठरवा. , रिव्हिजन (उजळणी) करण्यासाठी वेळ ठरवा. , प्रश्नपत्रिका सराव , अभ्यासाची वेळ , विषयातील प्राधन्यता आदि गोष्टींचा विचार अभ्यासाचे नियोजन करताना अवश्य करावा. ही एक चांगली संधी आपल्याला आहे. की, आपल्याकडे अजून खूप दिवस शिल्लक आहेत. या वेळेचा सदुपयोग करून आपण इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत यशस्वी व्हा ! सर्व विद्यार्थ्यांना शुभेछ्या





प्रत्येक नविन अपडेट - 'शिक्षण मित्र' वेबसाईट - सोशल मिडिया जॉईन करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post